महाराष्ट्र
Trending

महापालिका निकाल LIVE: कोल्हापुरात भाजपचा पहिला ‘गुलाल’

Pune PCMC Election : पुण्यात कमळ फुलले, मुंबईत ठाकरेंची चुरस

कोल्हापूर :- कोल्हापूर महानगरपालिकेतून Kolhapur BMC Election Result विजयाचा पहिला अधिकृत निकाल हाती आला आहे. प्रभाग क्रमांक ३ मधून भाजपचे पूर्ण पॅनेल विजयी झाले आहे.
विजयी उमेदवार (भाजप): राजनंदा महाडिक, वंदना मोहिते, प्रमोद देसाई आणि विजय माने.
सद्यस्थिती: कोल्हापूरमध्ये काँग्रेस १७ जागांवर, तर भाजप १५ जागांवर आघाडीवर आहे. प्रभाग ९ मधून काँग्रेसचे राहुल माने आघाडीवर आहेत.

पुणे: भाजपची ३२ जागांवर मुसंडी

पुणे महानगरपालिकेत भाजपने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले असून ३२ जागांवर आघाडी घेतली आहे.
प्रभाग २५ (आघाडीवर): स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडीत आणि राघवेंद्र मानकर (सर्व भाजप).
धक्का: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या रुपाली पाटील ठोंबरे आणि सुनील खाटपे सध्या पिछाडीवर आहेत.
पक्षीय बलाबल: राष्ट्रवादी १४, शिवसेना २ आणि काँग्रेस २ जागांवर आघाडीवर आहे.

मुंबई (BMC): वॉर्डनुसार चुरशीची लढत

मुंबईत २२७ जागांसाठी चुरस सुरू असून दिग्गजांनी आघाडी घेतली आहे:
वॉर्ड १८२ (दादर): शिवसेना (UBT) चे मिलिंद वैद्य आघाडीवर.
वॉर्ड २०२: माजी महापौर श्रद्धा जाधव (UBT) आघाडीवर.
वॉर्ड १४५: एमआयएमच्या खैरुनिस्सा अकबर हुसैन २७२८ मतांनी मोठी आघाडीवर.
वॉर्ड २०४: शिवसेना (शिंदे गट) चे अनिल कोकीळ आघाडीवर.
वॉर्ड ३३: भाजपच्या उज्ज्वल वैती १०३ मतांनी आघाडीवर.
वॉर्ड २०६: नाना आंबोले आघाडीवर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0