मुंबई

Mumbra Train Accident : मुंब्रा-दिवा अपघातात 8 प्रवाशांचा मृत्यू, रेल्वेने घेतला महत्त्वाचा निर्णय

•जीआरपी जवानाचाही मृत्यू; 238 नवीन लोकल गाड्यांना स्वयंचलित दरवाजे

मुंबई :- मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल रेल्वेमधून प्रवास करत असताना मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना घडली. लोकलच्या दरवाजात लटकून प्रवास करणारे प्रवासी समोरून येणाऱ्या ट्रेनला घासले गेले आणि खाली कोसळले. या भीषण दुर्घटनेत 8 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

या अपघातात जीआरपीचे जवान विकी बाळासाहेब मुख्यादल यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. लोकलमध्ये असलेली प्रचंड गर्दी, कमी डबे आणि उघडे दरवाजे यामुळेच ही दुर्घटना घडल्याचं स्थानिकांनी सांगितलं. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून, सुरक्षेच्या प्रश्नांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

दुर्घटनेनंतर रेल्वे बोर्डाने तात्काळ महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई उपनगरीय मार्गासाठी खरेदी करण्यात आलेल्या 238 एसी लोकल गाड्यांमध्ये ‘ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सिस्टिम’ बसवली जाणार आहे. तसेच विद्यमान लोकल डब्यांनाही रेट्रो फिटमेंटच्या माध्यमातून बंद दरवाज्यांची सुविधा देण्याचं नियोजन आयसीएफकडून करण्यात येत आहे.

रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी केवळ गाड्यांमध्ये नव्हे, तर प्रवाशांच्या शिस्तीमध्येही बदल गरजेचा असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

6 hours ago