Mumbra Soil Mafia : मुंब्रा खाडीत थरारक कारवाई – रेती माफियांचा साम्राज्यच खाडीत गाडलं!

मुंब्रा खाडीत ‘रेती माफियां’वर महसूल विभागाचा ‘सर्जिकल स्ट्राइक’!
50 लाखांचा मुद्देमाल महसूल विभागाने पाण्यात केला गाडून – बोट आणि पंप केला उद्ध्वस्त!
ठाणे (मुंब्रा) :– मुंब्रा खाडीत अवैध रेती उपशाचा धुमाकूळ अखेर महसूल विभागाच्या थरारक कारवाईने थांबवला! ‘काळ्या सोन्या’साठी ओढली जाणारी खाडीची वाळू, रेल्वे पुलाला घातक ठरण्याची शक्यता होती. Mumbra Soil Mafia News मात्र महसूल अधिकाऱ्यांनी वेळेवर हस्तक्षेप करत चक्क 50 लाखांचा मुद्देमाल – बोट आणि सक्शन पंप – खाडीतच बुडवून नष्ट केला! Thane Latest News
25 मे रोजी सकाळच्या सुमारास ठाणे उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील आणि तहसीलदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं. मंडळ अधिकारी शशिकांत जगताप आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिवा खाडी परिसरात गस्त सुरू झाली.
रेल्वे पुलाखाली सुरू होता रेतीचा ‘काळा सोन्याचा’ खेळ; महसूल विभागाने खेचली चौफेर धडक!
गुप्त माहितीच्या आधारे एका बोटीवर सक्शन पंपद्वारे रेती उपसा सुरू असल्याचं निदर्शनास आलं. पथकाने क्षणार्धात कारवाई करत ती बोट आणि पंप खाडीतच नष्ट केले. या मुद्देमालाची किंमत जवळपास 50 लाख रुपये असल्याची माहिती मिळते.
या कारवाईने रेती माफियांमध्ये खळबळ माजली असून, प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अशा अवैध धंद्यांना अजिबात पाठीशी घालणार नाही. यापुढील काळातही अशाच ठोस आणि निर्णायक कारवाया सुरू राहणार आहेत



