Mumbra Crime News : मुंब्रामध्ये घरफोडी ; सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरट्यांकडून लंपास
Mumbra Latest Crime News : दिवा भागातील एका घरामध्ये भर दिवसा चोरी करत 2 लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली.
ठाणे :- गणेशोत्सवाच्या Ganpati Ustav दरम्यान राज्यात ज्याप्रमाणे उत्साह मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्याचप्रमाणे जिल्ह्यातील घरफोडीचे सत्र सुरूच आहे. गणेशोत्सव दरम्यान शहरा बाहेर गेलेले अथवा गर्दीच्या ठिकाणी चोरांची घटनाही मोठ्या प्रमाणे वाढत आहे. अशीच एक घटना मुंब्रा पोलीस ठाण्याच्या Mumbra Police Station कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या दिवा पूर्व भागातील एक घरामध्ये कुलूप तोडून चोरटयांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा 2 लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी विनय विमलाशंकर दुबे (48 वर्ष, रा. दिवा पूर्व) यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरटीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Mumbra Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दुबे हे दिवा पुर्व येथील एका सोसायटीत राहायला आहेत. फिर्यादी 5 सप्टेंबर रोजी घराबाहेर गेले होते. चोरटयांनी घराच्या बाहेरील कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला. कपाट उघडून दागिने आणि रोख रक्कम असा 2 लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादेत नमूद केले आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 305(अ),331(3),331(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खेतले करत आहेत. Mumbra Latest Crime News