Mumbai Latest Crime News : मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई; 14 आरोपींना अटक, टोळी प्रमुखासह 5 आरोपी पाहिजे
मुंबई :- एम.डी. ड्रग्जच्या MD Drugs व्यवहारातून अपहरण आणि खंडणीच्या गंभीर गुन्ह्यात मुंबई गुन्हे Mumbai Crime Branch अन्वेषण विभाग, गुन्हे शाखा, कक्ष-3 ने मोठी कारवाई करत अटक केलेल्या 14 आरोपींविरुद्ध आणि 5 पाहिजे (फरार) आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का – MCOCA) अन्वये विशेष न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहे. Mumbai Latest Crime News
काय आहे प्रकरण?
फिर्यादी शब्बीर हुसेन मुबारक सिद्दीकी (वय 45) यांचा मित्र साजीद इलेक्ट्रीकवाला याला सखर खान याने एम.डी. (MD) या अंमली पदार्थाचा सेटअप बसवून एम.डी. बनवण्यासाठी 50 लाख रुपये दिले होते. ठरल्याप्रमाणे साजीद याने एम.डी. न दिल्याने किंवा पैसे परत न केल्याने, 12 जुन रोजी सरवर खान, युनुस चैवरपील आणि इतर आरोपींनी हॉटेल अलीबाबा, अंधेरी (प) येथून फिर्यादी आणि साजीद इलेक्ट्रीकवाला यांचे अपहरण केले. Mumbai Latest Kidnapping News
त्यानंतर दोघांनाही नेरळ येथील एका खोलीत डांबून ठेवून मारहाण करण्यात आली. 16 जुन रोजी पहाटे फिर्यादी यांनी डांबून ठेवलेल्या खोलीच्या खिडकीतून पळ काढत स्वतःची सुटका केली. मात्र, साजीद याला आरोपींनी खंडणी वसुलीसाठी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोंडून ठेवले होते. फिर्यादीच्या तक्रारीवरून ओशिवरा पोलीस ठाण्यात Oshiwara Police Station गुन्हा नोंद करण्यात आला.
मोक्काची कलमे लागू
गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी एकूण 14 आरोपींना अटक केली आहे. या टोळीचा प्रमुख म्हणून आरोपी मोहंमद तौसिफ मोह. हनिफ नेदी उर्फ तौसिफ मांडी याचे नाव निष्पन्न झाले आहे. संघटित गुन्हेगारीचा हा प्रकार असल्याने या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) कलम 3 (1) (ii), 3(2), 3(4) च्या तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत.
या गुन्ह्याचा परिपूर्ण तपास करून, अटक 14आरोपी आणि 5 पाहिजे (फरार) आरोपींविरुद्ध सबळ पुरावा गोळा करून दि. 9 ऑक्टोंबर रोजी मा. सत्र न्यायाधीश, विशेष मोक्का न्यायालय, मुंबई येथे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. या कारवाईमुळे संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांना मोठा धाक बसला आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…