Mumbai Weather Update : मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट, वाचा हवामान खात्याचा अंदाज
Mumbai Weather Update : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. मध्येच पाऊस थांबला असला तरी पुन्हा एकदा हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे.
मुंबई :- महाराष्ट्राच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे काही भागात नद्यांना पूर आला आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज मुंबईसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज मुंबईसह घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्याचवेळी, आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा पिवळा इशारा जारी करण्यात आला आहे.
मुंबईसह ठाण्यात मंगळवारी दुपारपासून पावसाने दिलासा दिला आहे. मात्र, आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर आणि अमरावती जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. Mumbai Weather Latest Update
सध्या राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतीच्या कामांनाही वेग आला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीची कामेही पूर्ण केली आहेत. काही भागात अद्याप पेरणी झालेली नाही. शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.छत्रपती संभाजीनगर विभागात खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र 20.90 लाख हेक्टर असून, जिल्ह्यात आतापर्यंत 18.91 लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. बाजरी, मका, सोयाबीन, उडीद, हरभरा, कापूस, भुईमूग या खरीप हंगामातील पिकांची पेरणी सुरू असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात चांगला पाऊस होईल . Mumbai Weather Latest Update