•भात कापणी सुरू असतानाच पाऊस कोसळल्याने बळीराजा संकटात; रविवारपर्यंत पावसाचा अंदाज
वसई-विरार :- वसई-विरार शहराला मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसू लागला आहे. शनिवार, 25 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास शहरात विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली. अवघ्या काही मिनिटे कोसळलेल्या पावसामुळे नालासोपारा परिसरातील रस्ते जलमय झाले असून, नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
ऑक्टोबरमध्येही पावसाची हजेरी
ऑक्टोबर महिना संपत आला असला तरी वसई-विरार शहरात अधूनमधून पावसाची रिपरिप सुरूच आहे. दिवाळी संपल्यानंतरही शहरात पावसाचा जोर कायम आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
शनिवारी दुपारी वसई-विरारच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली. काही भागात रिमझिम तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.
नागरिकांची गैरसोय
या अवेळी कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः नालासोपारा परिसरातील गाला नगरसह विविध ठिकाणी अवघ्या काही मिनिटांत पाणी साचून रस्ते जलमय झाले. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसाने तात्पुरता दिलासा दिला असला, तरी धुळीने भरलेले रस्ते आता चिखलमय झाले आहेत. त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
बळीराजा संकटात
वसई-विरारच्या ग्रामीण भागात भात पिके कापणीसाठी तयार झाली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी भात कापणी सुरू केली असतानाच या अवकाळी पावसात कापणी केलेले भात भिजून गेल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. पावसाचे सत्र असेच सुरू राहिल्यास हातातोंडाशी आलेला भाताचा घास निसटून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…