Mumbai Weather Update : मुंबईकरांना सहन करावा लागणार उन्हाचा मारा, मुंबईत उष्णतेचा पारा चढला

Mumbai Weather Update : मुंबईतील तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. तसेच उष्णतेत वाढ होणार आहे.
मुंबई :- मुंबईकरांना उन्हाळ्याच्या पूर्वीच उष्णतेच्या चटके लागणार असून मागील काही दिवसांपासून मुंबईत तापमानात घट झाल्याने वातावरणात बदल झाला आहे. Mumbai Weather Update दिवसभरात मुंबईत उष्णतेच्या झळा आणि रात्री गारवा अशी परिस्थिती मुंबईत उद्भवली आहे.दरम्यान, मुंबईत मंगळवारी उष्ण वातावरण, तसेच उन्हाचा ताप सहन करावा लागणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे मंगळवारी दिवसभर उकाडा तसेच उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे.
मात्र, आता पुन्हा उकाडा आणि उन्हाचा ताप सहन करावा लागणार आहे. समुद्रातून उशिरा येत असलेल्या वाऱ्यांमुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे हवामान विभागाने सांगितले. बुधवारपर्यंत उष्ण वातावरण राहील त्यानंतर मात्र तापमानात काहीशी घट होईल. या कालावधीत तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअसदरम्यान राहील. तसेच उष्णतेत वाढ होणार आहे. उन्हाच्या झळा आणि उकाड्याने हैराण करणारा एप्रिल महिना सुरू होण्यापूर्वीच फेब्रुवारी महिन्यात कडक उन्हामुळे मुंबईकरांना चटक्यांची जाणीव करून दिली होती