मुंबई
Trending

Mumbai Weather Update : मुंबईत मोसमी पावसाआधीच धुवाधार! नरिमन पॉईंटला अवघ्या तासाभरात 104 मिमी पाऊस*

Mumbai Weather Update Rain News : हवामान विभागाचा रेड अलर्ट, शहरातील जनजीवन विस्कळीत

मुंबई :- मोसमी पावसाची अधिकृत नोंद अद्याप झाली नसली, तरी मुंबईकरांनी आज पावसाच्या तडाख्याचा अनुभव घेतला. रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने सोमवारी सकाळी नरिमन पॉईंट परिसराला अक्षरशः जलमय केले. केवळ सकाळी 9 ते 10 या एक तासात या भागात तब्बल 104 मिमी पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली.

रविवारी मध्यरात्रीपासून संततधार सुरू; रस्ते जलमय, कामकाजावर परिणाम

हवामान विभागानुसार, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीसह मुंबईमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. यामुळे मुंबईसाठी ‘रेड अलर्ट’जारी करण्यात आला असून, पुढील काही तासांत अजून जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, शहरातील अनेक भागांमध्ये गटारांचे पाणी रस्त्यावर आले असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कामावर निघालेल्या नागरिकांची मोठी तारांबळ झाली असून, अनेकांनी ऑफिसला पोहोचण्यासाठी अतिरिक्त वेळ घेतला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 24 तास मुंबईकरांसाठी आणखी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0