मुंबई

Mumbai Weather Update : मोसमी पावसाची माघार होताच राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा चटका!

•सांताक्रूझमध्ये 37°C तापमानाची नोंद; कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

मुंबई :- राज्यात सध्या उन्हाचा कडाका, उकाडा आणि ढगाळ वातावरण अनुभवयाला मिळत आहे. शुक्रवारी (17 ऑक्टोबर 2025) मोसमी पावसाने संपूर्ण देशातून माघार घेतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. या माघारीनंतर राज्यात ‘ऑक्टोबर हिट’चा तीव्र चटका जाणवत आहे. याचबरोबर दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय झाले आहेत.

सांताक्रूझमध्ये सर्वाधिक तापमान

मोसमी पावसाने माघार घेतल्यानंतर राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. अनेक भागांमध्ये कमाल तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले गेले आहे, ज्यामुळे नागरिकांना असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. शुक्रवारी संपूर्ण राज्यात सांताक्रूझ (मुंबई) येथे सर्वाधिक 37 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, जे सरासरीपेक्षा अधिक होते. ऑक्टोबरमध्ये कमाल तापमान साधारण 33 अंश सेल्सिअस अपेक्षित असते. समुद्रावरून येणारे वारे उशिरा वाहत असल्यामुळे मुंबईच्या तापमानात वाढ झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

या भागात पावसाची शक्यता

एकीकडे तापमानाचा पारा चढा असताना, हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवसांदरम्यान काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम

अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटाजवळ चक्राकार वारे वाहत आहेत आणि त्यांची दिशा दक्षिणेकडे झुकलेली आहे. यामुळे शनिवारी लक्षद्वीप परिसरात केरळ-कर्नाटक किनाऱ्यालगत कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात सध्या ऑक्टोबर हिटचा चटका चांगलाच अनुभवायला मिळत असून, पुढील दोन ते तीन दिवस तापमानातील ही वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

38 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago