मुंबई

Mumbai Water Supply : मेट्रो प्रकल्पामुळे अंधेरी व विलेपार्ले पूर्व परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत

•वेरावली जलाशयाजवळ खोदकामामुळे अनेक भाग प्रभावित

मुंबई | मुंबईतल्या मेट्रो-7 अ प्रकल्पाच्या कामांमुळे अंधेरी (पूर्व) आणि विलेपार्ले (पूर्व) परिसरातील नागरिकांना 22 ते 28 जून दरम्यान कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) यांच्यातर्फे वेरावली जलाशयाखाली असलेल्या 1800 मिमी व्यासाच्या महत्त्वाच्या पाईपलाइनखाली बोगदा खोदण्याचे काम करण्यात येणार आहे.

22 ते 28 जूनदरम्यान कमी दाबाने पाणी येणार.. हे खोदकाम 22 जूनपासून दररोज सकाळी 7.30 ते दुपारी 3.30 आणि रात्री 9.30 ते पहाटे 3.30 या वेळेत सुरू राहणार आहे. त्यामुळे के पूर्व विभागात पाणीपुरवठ्याचा दाब कमी होणार असून नागरिकांना वेळापत्रकानुसार पाणी साठवण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

कोणत्या भागांवर होणार परिणाम?

विलेपार्ले (पूर्व): सायंकाळी 5 ते रात्री 8 या वेळेत पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.

अंधेरी (पूर्व): जुना नागरदास रोड, नवीन नागरदास रोड, मोगरापाडा, अंधेरी-कुर्ला मार्ग या भागांमध्ये रात्री 8 ते 9.30 या वेळेत पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे.

MMRDA व BMC प्रशासनाने नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचे व गरजेपुरतेच पाणी वापरण्याचे आवाहन केले आहे. या काळात कोणत्याही तक्रारींसाठी स्थानिक जल पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधण्याची सूचना देण्यात आली आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

43 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago