Mumbai Water Supply Cut News : योगी हिल मार्गावरील विकास रस्त्याच्या कामामुळे पाणीपुरवठा पूर्णतः बंद
मुंबई | मुलुंड पश्चिमच्या नागरिकांना येत्या शनिवार, 19 जुलै रोजी 12 तास पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. Mumbai Mulund Water Supply News वीणा नगर येथील योगी हिल मार्गावरील विकास नियोजन रस्त्याचं काम हाती घेण्यात येत असल्याने, या भागातील पाणीपुरवठा सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहणार आहे.
टी विभागातील अनेक भागांवर याचा परिणाम होणार असून, महानगरपालिकेने नागरिकांना 18 जुलै रोजी पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पुढील 3 ते 4 दिवस पाणी गाळून व उकळून वापरण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
पाणीबंद क्षेत्र
मलबार हिल मार्ग,स्वप्ननगरी,वीणा नगर,मॉडेल टाऊन मार्ग,योगी हिल मार्ग,घाटीपाडा,बी.आर. मार्ग (ज्यांचा नियमित पाणीपुरवठा सायंकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत असतो.
योगी हिल मार्गावर विकास रस्त्यासाठी 600 मिमी व्यासाच्या जलवाहिनीची जोडणी केली जाणार आहे. हे काम शनिवार, 19 जुलै रोजी सकाळी 10 ते रात्री 10 या कालावधीत करण्यात येणार आहे. त्या दरम्यान जलवाहिनीतील दाब व पुरवठा पूर्णतः खंडित राहील.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…