मुंबई

Mumbai Visarjan Sohala 2025 : गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या!’ च्या गजरात मुंबईकरांचे डोळे पाणावले; भावपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप

•गणरायाला निरोप देण्यासाठी सज्ज आहे मुंबापुरी, फोटो गॅलरी

मुंबई :- गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या जल्लोषानंतर आज अनंत चतुर्दशीच्या मंगलदिनी मुंबईत बाप्पाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी उसळली आहे. गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी आणि इतर विसर्जन स्थळांवर भक्तांचा महासागर लोटला असून, सर्वत्र भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण आहे.

मुंबईतील गणेश गल्लीच्या ‘मुंबईच्या राजा’ ची विसर्जन मिरवणूक दुपारीच सुरू झाली आणि ती हळूहळू गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे. मिरवणुकीच्या मार्गावर दोन्ही बाजूंना भाविक मोठ्या संख्येने उभे आहेत.

फोटो गॅलरी

vivek

Recent Posts