ब्रेकिंग न्यूज – जळगावमध्ये राजकीय घराण्याच्या फार्महाऊसवर बोगस कॉल सेंटरचा धडाका!

जळगाव – शहर हादरवणारी कारवाई! जळगाव पोलिसांनी एका बोगस कॉल सेंटरचा भंडाफोड केला असून धक्कादायक बाब म्हणजे हे कॉल सेंटर माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फार्महाऊसमध्ये सुरू असल्याचा खुलासा झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी ललित कोल्हेसह तब्बल 8 जणांना अटक केली आहे. Jalgaon Crime News



ललित कोल्हे हे शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सरिता माळी कोल्हे यांचे पती असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या मते, या कॉल सेंटरमधून लोकांना फसवून लाखो रुपयांची उकळपट्टी केली जात होती. Jalgaon Fake Call Center News
राजकीय आशीर्वादाखाली सुरू असलेल्या या धंद्यामुळे प्रशासनातील सडकेला पुन्हा एकदा उघडे पाडणारा हा प्रकार आहे. माजी महापौरांच्या मालकीच्या ठिकाणी असा गैरप्रकार सुरू असणे हा जनतेच्या विश्वासाला तडा देणारा आणि राजकीय नैतिकतेला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार असल्याची तीव्र चर्चा नागरिकांमध्ये आहे.
पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून या बोगस साम्राज्याचे अजून किती भांडाफोड होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


