मुंबई

Mumbai University Senate Election 2024 Result : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरे यांचा जलवा! युवासेनेने केला ABVPचा पराभव

Mumbai University Senate Election 2024 Result : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेने 10 पैकी 10 जागा जिंकल्या आहेत. सिनेटच्या एकूण 10 जागांपैकी 5 जागा राखीव होत्या

मुंबई :- मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे निकाल Mumbai University Senate Election 2024 Result लागले आहेत. शिवसेनेची युवासेनेने (ठाकरे) 10 पैकी 10 जागा जिंकल्या आहेत. या विजयाकडे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे Aaditya Thackeray यांचा ‘वर्चस्व’ म्हणून पाहिले जात आहे. सिनेटमधील एकूण 10 जागांपैकी 5 राखीव आहेत, तर 5 खुल्या होत्या.आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली. गेल्या निवडणुकीप्रमाणे यावेळीही युवासेनेने सिनेटवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

विजयी उमेदवार

  • मयूर पांचाळ – युवासेना – 5350 मते,
  • ओबीसी प्रवर्ग शीतल देवरुखकर सेठ -5498 मते
  • अनुसूचित जाती प्रवर्ग डॉ.धनराज कोहचाडे- 5247 मते
  • एसटी प्रवर्ग स्नेहा गवळी- महिला
  • शशिकांत झोरे- एनटी प्रवर्ग

महिला प्रवर्ग

  • युवासेना स्नेहा गवळी – महिला – 5914 मते
  • ABVP-रेणुका ठाकूर-893

एसी प्रवर्ग

  • युवासेना – शीतलशेठ देवरुखकर – 5489
  • ABVP – राजेंद्र सायगावकर – 1014

ओबीसी प्रवर्ग

  • युवासेना मयूर पांचाळ – 5350 अभाविप राकेश भुजबळ – 888

एसटी प्रवर्ग

  • युवासेना धनराज कोचाडे – 5247 ABVP – निशा सवरा – 924

एनटी प्रवर्ग

युवासेना शशिकांत झोरे – 5170 ABVP-अजिंक्य जाधव-1066

मतपत्रिकांची तपासणी व वैध व अवैध मतपत्रिकांची पडताळणी केल्यानंतर पसंती क्रमांकानुसार मतमोजणीला सुरुवात झाली. यावेळी 7200 पैकी 6684 मतपत्रिका वैध ठरल्या. खुल्या प्रवर्गासाठी साधारणत: 1114 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेने दहा जागांवर उमेदवार उभे केले होते.भाजपच्या नेतृत्वाखालील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (एबीव्हीपी) 10 उमेदवारांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत इतर आठ उमेदवारांसह एकूण 28 उमेदवार रिंगणात होते. Mumbai University Senate Election 2024 Result

सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. बनावट पोलिंग एजंट प्रकरणात उच्च न्यायालयाने विद्यापीठ प्रशासन आणि संबंधित उमेदवाराला नोटीस बजावली.एकाच ठिकाणी झालेल्या गोंधळामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया स्थगित करता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. अभाविपने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे.Mumbai University Senate Election 2024 Result

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0