Mumbai University Senate Election 2024 : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांची युवा सेना “पास”

Mumbai University Senate Election 2024 : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरे यांच्या शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांची युवा सेनाचे वर्चस्व कायम, वरूण सरदेसाई यांनी या निवडणुकीची धुरळा घेतली होती हातात
मुंबई :- शिवसेना आदित्य ठाकरे Aaditya Thackeray Shivsena यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या युवा सेनेचे अतिशय प्रतिष्ठेची मानली जाणारी निवडणुका म्हणून मुंबई विद्यापीठाच्या सिनेट Mumbai University Senate Election 2024 कडे पाहिले जाते. राज्यात विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांचा करिष्मा कायम राहत असून वरूण सरदेसाई यांच्या नेतृत्वातील युवा सेनेला चांगलेच यश आले आहे. वरुण सरदेसाई यांनी या निवडणुकीची धुराळा आपल्या हाती घेतली होती. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या युवा सेनेच्या आत्तापर्यंत पाच जागेवर विजयी झाला आहे.
विजयी उमेदवार
- मयुर पांचाळ – युवासेना – 5350 मते, ओबीसी प्रवर्ग
- शितल देवरुखकर शेठ – 5498 मते- SC प्रवर्ग
- डॉ. धनराज कोहचाडे- 5247 मते – ST प्रवर्ग
- स्नेहा गवळी- महिला
- शशिकांत झोरे – NT प्रवर्ग
सिनेटच्या निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या युवासेनेने दहा जागांवर उमेदवार उभे केले होते. ते भाजपप्रणित आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही दहा उमेदवार दिले होते. इतर आठ उमेदवार धरून या निवडणुकीत एकूण 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. 24 सप्टेंबर रोजी झालेल्या मतदानामध्ये 13 हजार 406 पैकी 55 टक्के मतदारांनी 10 मतदानाचा हक्क बजावला. त्यासाठी विद्यापीठाने आपल्या परीक्षेत्रात 38 मतदान केंद्रांवर 64 बुधची उभारणी केली होती. Mumbai University Senate Election 2024


