Mumbai Crime Branch : त्याचा खास शिलेदार डी. के. राव १.५ कोटींच्या खंडणी प्रकरणात अटक — गुन्हे शाखेची सत्र न्यायालयाबाहेर थरारक कारवाई!
मुंबई प्रतिनिधी:विवेक राजेंद्र जगताप
मुंबई गुन्हे शाखेने Mumbai Crime Branch छोटा राजन टोळीवर Mumbai Underworld Don Choota Rajan मोठा हातोडा मारत त्याचा विश्वासू लेफ्टनंट समजला जाणारा डी. के. राव याला शुक्रवारी थेट सत्र न्यायालयाच्या आवारात अटक केली आहे. Mumbai Crime Branch Latest News
त्याच्यासोबत दोन साथीदार — अनिल सिंग आणि मिमित घुटा — यांनाही जेरबंद करण्यात आले असून,
१.५ कोटींच्या खंडणी प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
सत्र न्यायालयाबाहेरच सापळा — डी. के. राव ‘थेट ताब्यात’!
डी. के. राव कोर्टातील सुनावणीसाठी आला असताना,
गुन्हे शाखेच्या पथकाने धोबीपछाड कारवाई करून त्याला ताब्यात घेतले.
त्याच्या अटकेने राजन टोळीच्या हालचालींबाबत पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.
खंडणीचा खेळ : बिल्डरकडून न परतवलेले १.५ कोटी रुपये आणि धमक्या!
तक्रारदाराने एका बिल्डरला १.५ कोटी रुपये गुंतवणुकीसाठी दिले होते,
मात्र बिल्डरने ती रक्कम परत केली नाही.
उलट बिल्डरनेच तक्रारदाराला दाबण्यासाठी डी. के. रावचा हात धरला.
यानंतर रावने “राजन टोळीच्या नावावरून” धमक्या देत
तक्रारदाराकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला.
तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारीनंतर गुन्हे शाखेने गुप्त तपास राबवून
राव आणि त्याच्या दोन्ही साथीदारांना शुक्रवारी अटक केली.
गुन्हे शाखेचा चोख डाव
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुनियोजित सापळा रचून
रावला न्यायालय परिसरातूनच पकडले.
त्याला आणि त्याच्या दोन्ही साथीदारांना शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
या कारवाईमुळे छोटा राजन गँगच्या उरलेल्या नेटवर्कवर आता आणखी आवळा येणार,
असे पोलिस सूत्रांकडून समजते.
महत्त्वाची पार्श्वभूमी
डी. के. राव हा गेल्या अनेक दशकांपासून छोटा राजन टोळीशी जोडलेला असून,
त्याच्यावर खंडणी, मारहाण, खून, जमीन व्यवहारातील दबाव अशा अनेक गुन्ह्यांचे ढीग आहेत.
तुरुंगात असतानाही त्याच्या नावावरून
मुंबईत गुन्हेगारीच्या हालचाली सुरू असल्याच्या
अनेक तक्रारी पोलिसांकडे येत होत्या.
गुन्हे शाखेचे पथक
पोलीस आयुक्त देवेन भारती,
सहपोलीस आयुक्त लखमी गौतम,
अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे,
गुन्हे शाखा उपायुक्त नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
ही कारवाई पथक प्रमुख पो.नि. (गुन्हे) संदीप घोडके
आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…