Mumbai Trombay Police : मुंबईत ‘एमडी’ तस्करांचे धाबे दणाणले! ट्रॉम्बे पोलिसांचा नाकाबंदीत ‘शॉर्ट-सर्जिकल स्ट्राईक’, 80 हजारांचे विषारी ड्रग्ज जप्त

Mumbai Trombay Police Take Action Against Drug Dealer : पोलिसांची सलग दुसरी मोठी कारवाई; चिता कॅम्पमधील दोन सराईत गुन्हेगार थेट जाळ्यात, एमडी तस्करीच्या मुळापर्यंत तपास सुरू
मुंबई :- मुंबई शहराला ड्रग्जमुक्त Mumbai Drug Free City करण्याच्या निर्धारानुसार, ट्रॉम्बे पोलिसांनी अंमली पदार्थांच्या तस्करांना धडा शिकवण्यासाठी ‘शॉर्ट-सर्जिकल स्ट्राईक’ची मोहीम तीव्र केली आहे. आज, 06 ऑक्टोबर 2025 रोजी पोलिसांनी गस्तीदरम्यान अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारावर सापळा रचून 80 हजार रुपये किंमतीचा 40 ग्रॅम मॅफेड्रॉन (M.D.) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे.Mumbai Latest Drug News
गुन्हे प्रकटीकरण पथकाला गुप्त बातमीदाराकडून खबर मिळाली की, दोन संशयित आरोपी एमडी ड्रग्जची विक्री करण्यासाठी ट्रॉम्बे परिसरात येणार आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी कोणताही वेळ न दवडता नियोजनबद्ध सापळा रचला आणि दोन्ही आरोपींना रंगेहाथ ताब्यात घेतले. यामध्ये मोहम्मद फैज अली खान (24 वय) आणि जाहिद जहांगीर अली शेख (35 वय) या चिता कॅम्पमधील सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. Mumbai Latest Crime News
अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल असलेले जुने गुन्हेगार आहेत. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी अधिनियम 1985 च्या कलमांखाली कठोर गुन्हा नोंदवला आहे. विशेष म्हणजे, ट्रॉम्बे पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कारवायांमध्ये सलग दुसऱ्यांदा मोठे यश मिळवले असून, अंमली पदार्थ विरोधी पथकाची ही कामगिरी अत्यंत मोलाची ठरली आहे.
पोलीस उप आयुक्त समीर शेख आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक ऋता नेमलेकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने हा थरार यशस्वी केला. या अटकेमुळे आता अंमली पदार्थांच्या तस्करीच्या जाळ्याच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा तपास पोलीस करत आहेत.


