Mumbai Train Accident : दिवा-मुंब्रा रेल्वे अपघात: प्रवाशांचा मृत्यू, चौकशी सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Mumbai Train Accident: जखमींवर उपचार सुरू; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रेल्वे सुरक्षेवर गांभीर्य वाढवण्याचा इशारा दिला
Mumbai Train Accident: दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान उपनगरीय लोकलमधून 10-12 प्रवासी खाली पडून अपघात झाला, ज्यात काही प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. जखमींना शिवाजी हॉस्पिटल व ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू असून, स्थानिक प्रशासन त्यांच्या देखभालीसाठी समन्वय साधत आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, “ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने तत्काळ सुरू केली आहे.” उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही रेल्वे प्रशासनावर गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अधिक जबाबदारी घ्यावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी अपघातातील जखमींच्या लवकर सुधारणा होण्यासाठी प्रार्थना केली आणि मृतांच्या कुटुंबियांना सांत्वन दिले.
“मध्य रेल्वेमार्गावर कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाडीतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दूर्दैवी, क्लेशदायक आहे.
रेल्वे प्रवाशांच्या मृत्यूनं उपनगरी रेल्वेवरील गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्याकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज अधोरेखीत झाली आहे. उपनगरीय रेल्वेसेवा अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन लवकरात लवकर ठोस पावलं उचलेल, असा विश्वास आहे. अपघातात जखमी प्रवाशांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो. मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून दिवंगत प्रवाशांना दुःखद अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यरेल्वेवर कोपर ते दिवा स्थानकादरम्यान झालेल्या रेल्वे अपघाताबद्दल दुःख व्यक्त करुन दिवंगत प्रवाशांना श्रद्धांजली वाहिली आहे.
राजकीय नेत्यांकडून हादरवणारे वक्तव्य; मुंबई लोकलमधील गर्दी आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
हे कधीच घडायला नको होते – प्रकाश आंबेडकर
अत्यंत दुःखद !
जर भारतीय रेल्वेने सोशल मीडियावरील रील्सपेक्षा प्रवाशांच्या सुरक्षेकडे लक्ष दिले असते तर हे कधीच घडायला नको होते.
संपूर्ण सत्य उघड करण्यासाठी आणि प्रत्येक स्तरावर जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी या घटनेची सखोल आणि पारदर्शक चौकशी करण्याची मी जोरदार विनंती करतो.
जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांना तसेच जखमींना आवश्यक असलेली सर्व आर्थिक आणि वैद्यकीय मदत त्वरित देण्यात यावी.
या दुर्घटनेसाठी केवळ उत्तरेच नव्हे तर भविष्यात अशा टाळता येण्याजोग्या घटना टाळण्यासाठी अर्थपूर्ण धोरणात्मक कृतीची आवश्यकता आहे.
पुष्पक एक्स्प्रेसमधून खाली पडल्यामुळे पाच प्रवाशांना प्राण गमावावे लागले. कसारा स्टेशनजवळ ही दुर्दैवी घटना घडली. यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना भावपूर्ण श्रद्धांजली. या गाडीत प्रचंड गर्दी असल्याने हे प्रवासी दरवाजात लटकून प्रवास करीत होते. अशा पद्धतीने प्रवास करणे धोकादायक आहे. नागरीकांना नम्र विनंती आहे की कृपया आपण धोकादायक पद्धतीने प्रवास करु नये. यासोबतच रेल्वे प्रशासनाने देखील गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि संभाव्य नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करावी.
पुष्पक एक्स्प्रेसमधून एकदम इतके लोक बाहेर पडून अपघात होणे ही घटना हृदयद्रावक आणि गंभीर आहे. मुंबईतील रेल्वे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे करणारी ही घटना आहे. यामध्ये जखमी प्रवाश्यांना लवकर आराम मिळो
मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये आज झालेला भीषण अपघात अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारे आहे. मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे लाखो प्रवाश्यांना रोज जीव मुठीत घेऊन लटकून प्रवास करावा लागतो. अश्याच ६ प्रवाशांचा आज अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंबईतील प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करता येत नाही, गर्दीच्या वेळी अधिकच्या ट्रेन सोडल्या जात नाही, तिथे अधिक लाईन टाकल्या जात नाही, ट्रेनला उशीर झाला की गर्दी अजून वाढत जाते अशा मुंबई लोकलच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी रेल्वेमंत्री फक्त रिल्स बनवण्यात व्यस्त असतात. सामान्य मुंबईकर जीव मुठीत घेऊन लटकत ट्रेनमधून पोटापाण्यासाठी प्रवास करतात. हा लोकल ट्रेनचा प्रवास आता मुंबईकरांच्या जीवावर उठला आहे रेल्वेमंत्र्यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा ही आमची मागणी आहे. महायुती सरकारने आता तरी मुंबई लोकल ट्रेनच्या प्रश्नांबाबत केंद्राकडे पाठपुरावा करावा
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…