मुंबई

Mumbai Traffic Update: कल्याण-डोंबिवली, भिवंडी वाहतूक व्यवस्था मध्ये बदल, अधिसूचना जारी!

Mumbai Latest Traffic Update : मतमोजणी दरम्यान वाहतूक व्यवस्था मोठा बदल, मतमोजणी केंद्राजवळ नो पार्किंग

कल्याण :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर Vidhan Sabha Election वाहतूक व्यवस्था मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. मतमोजणी दरम्यान मतमोजणी केंद्राच्या Election बाहेरील पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला असून अनेक मार्गांवर वाहतूक बंदी करण्यात आली आहे. केंद्र बाहेर पार्किंग बंद करण्यात आले आहे.कल्याण-डोंबिवली महापालिका Kalayan Dombivli BMC हद्दीत कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण व डोंबिवली विधानसभा मतदारसंघ येतात. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया व 23 ला मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान साहित्य व मतपेटी वाटपानी प्रक्रिया 19 नोव्हेंबर व मतदान साहित्य स्वीकृती प्रक्रिया 20 नोव्हेंबरला पार पडणार आहे, तसेच 23 नोव्हेंबरला डोंबिवली व कल्याण ग्रामीणची मतमोजणी डोंबिवलीतील संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल येथे होणार आहे, तसेच कल्याण पश्चिम व कल्याण पूर्वची मतनोंदणी खडगोळवली येथील महापालिकेच्या महिला उद्योग केंद्र येथे होणार आहे. या दोन्ही ठिकणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ नये, वाहतूक सुरळीत सुरू व्हावी, यासाठी वाहतूक विभागाने 18 ते 20 नोव्हेंबर व 23 नोव्हेंबरला काही बदल केले आहेत. Kalyan Latest Traffic Update

वाहतूक बदल पुढीलप्रमाणे

डोंबिवली

1.डोंबिवली स्टेशन, चार रस्ता, टिळक चौक, शेलारनाका मार्गे घरडा सर्कलकडे जाणाऱ्या सर्व प्रकरच्या वाहनांना डोबिवली वाहतूक उपविभाग हद्दीत शिवम हॉस्पिटल, डोंबिवली पूर्व येथे “प्रवेश बंद” करण्यात येत आहे. सदर वाहने शिवम हॉस्पिटलमधून उजवीकडे वळून जिमखाना रोड, सागर्ली मार्गे इच्छितस्थळी जातील.

2.सुयोग रिजन्सी अनंतम, पेंढरकर कॉलेज मार्गे घरडा सर्कलकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना आर. आर. हॉस्पिटल, डोंबिवली पूर्व येथे “प्रवेश बंद” आहे. सदर वाहने आर. आर. हॉस्पिटल येथून डावीकडे वळून कावेरी चौक, एम.आय.डी.सी. मार्गे इच्छितस्थळी जातील.

3.खंबाळपाडा रोड, 90 फूट रस्ता, ठाकुर्ली रोडकडून घरडा सर्कलकडे, तसेच विको नाक्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना बंदीश पॅलेस येथे “प्रवेश बंद” आहे. ही वाहने खंबाळपाडा रोड, 90 फूट रस्ता, ठाकुर्ली रोडकडून येणारी वाहने खंबाळपाडा रोड- टाटा नाका मार्गे इच्छितस्थळी जातील.

4.आजदेगाव व आजदे पाडा कमान येथून घरडा सर्कल मार्गे बंदीश पॅलेसकडे जाणाऱ्या रोडवर सर्व प्रकारच्या वाहनांना घरडा सर्कल येथे “प्रवेश बंद” आहे. ही वाहने आजदेगाव व आजदे पाडा कमान येथून बाहेर पडणारी वाहने डावीकडे वळून शिवम हॉस्पिटल मार्गे इच्छितस्थळी जातील.

5.कल्याण शीळ रोडवरून विको नाका मार्गे बंदिश पॅलेस कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना विको नाका येथे “प्रवेश बंद” आहे. कल्याण शीळ रोड मार्गे जाणारी वाहने सरळ मानपाडा पोलिस ठाणे मार्गे टाटा नाका येथून इच्छितस्थळी जातील.

6.आर. आर. हॉस्पिटल ते शिवम हॉस्पिटल व शिवम हॉस्पिटल ते आर. आर. हॉस्पिटल रस्त्याचे दुर्तफा “नो पार्किंग” झोन करण्यात येत आहे.

7.घरडा सर्कल ते बंदीश पॅलेस व बंदीश पॅलेस ते घरडा सर्कल रस्त्याच्या दुर्तफा “नो पार्किंग” झोन कारण्यात येत आहे.

8.बंदीश पॅलेश ते विको नाका व विको नाका ते बंदीश पॅलेस रस्त्याच्या दुर्तफा “नो पार्किंग” झोन केला आहे.

कल्याणमधील बदल

1.जूना पुणा लिंक रोडवरून विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकासमोरून रॉयल रसिडेन्सी, खडेगोळवलीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनसमोर प्रवेश बंद” केला आहे. सदर वाहने आनंद दिघे चौक मार्गे अथवा अपर्णा डेअरी मार्गे इच्छितस्थळी जातील.

2.खडेगोळवली मार्गे रॉयल रेसीडेन्सी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक, जुना पुना लिंक रोडवर येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना महालक्ष्मी मेडिकल अँड जनरल स्टोअर्स येथे प्रवेश बंद केला आहे. ही वाहने कैलास नगर, गोळवली, अपर्णा डेअरी मार्गे इच्छितस्थळी जातील.

3.उल्हासनगर शहरातून श्रीराम चौक मार्गे कल्याणच्या दिशेने येणाच्या सर्व सहाचाकी, जड वाहनांना विठ्ठलवाडी वाहतूक उपविभाग हद्दीत श्रीराम चौक येथे “प्रवेश बंद” केला आहे. ही वाहने उल्हासनगर मार्गे इच्छित स्थळी जातील.

4.चक्कीनाका कल्याण पूर्वकडून जुना पुना लिंक रोडने आनंद दिघे चौक मार्गे श्रीराम चौककडे जाणाऱ्या सर्व सहाचाकी जड अवजड वाहनांना आनंद दिघे चौक, स्मशानभूमी चौक येथे प्रवेश बंद केला आहे. सदर वाहने आनंद दिघे चौक येथून डावीकडे वळण घेऊन वालधुनी मार्गे इच्छितस्थळी जातील.

5.आनंद दिघे चौक ते अपर्णा डेअरी व अपर्णा डेअरी ते आनंद दिघे चौक रस्त्याच्या दुतर्फा नो पार्किंग झोन केला आहे.

6.विठ्ठलवाडी स्टेशन पूर्व ते महालक्ष्मी मेडिकल अँड जनरल स्टोअर्स व महालक्ष्मी मेडिकल अँड जनरल स्टोअर्स ते विठ्ठलवाडी स्टेशन पूर्व रस्त्याचे दुतर्फा नो पार्किंग झोन केला आहे.

भिवंडी मधील वाहतूक बद्दल

1.वराळदेवी सर्कलकडुन कामतपर कड़े जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना खड़ी मशिन येथे प्रवेश बंद’ करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग वाहने खड़ी मशिन येशुन वराळदेवी सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील

2.कामतभर कडून वराळदेवी सर्कलकडे येणान्या सर्व प्रकारच्या वाहनांना मनोज काटेकर यांचे गराजवळ प्रवेश प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.वाहने मानसरोवर तलावास वळसा घेवुन भाग्यनगर मानसरोवर मार्गे इच्छित स्थळी जातील खड़ी मशिन ते मनोज काटेकर यांचे घरापर्यंत रस्त्याचे दोन्ही बाजुस “नो पार्किंग करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0