Mumbai Traffic Update : राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 मे ला एकाच मंचावर.. शिवाजी पार्कमध्ये महायुती करिता मनसेकडून प्रचार सभा आयोजित
Mumbai Shivaji Park Near Traffic Update : शिवाजी पार्क परिसरात छावणीच्या स्वरूप, वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठा बदल
मुंबई :- महायुतीच्या प्रचाराचे सांगता सभा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दादरच्या शिवाजी Dadar Shivaji Park पार्क येथे शेवटची सभा होणार आहे या सभेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सह संपूर्ण मंत्री मंडळ या सभेला उपस्थित राहणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजप आणि शिवसेना महायुती घटक युतीतील घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहणार असल्यामुळे शिवाजी पार्क परिसरात छावणीच्या स्वरूप आले आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलीस उप आयुक्त समाधान पवार यांनी वाहतुकीची परिस्थिती लक्षात घेता सतरा वेळा सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आले आहे. Mumbai 17 May Dadar Traffic Update
वाहतूक व्यवस्थेमध्ये कशाप्रकारे बदल करण्यात आले आहे ते पुढील प्रमाणे.
वाहने उभी करण्यास प्रतिबंध असलेले रस्ते
१.स्वातंत्रवीर सावरकर मार्ग: बाबासाहेब वरळीकर चौक (सेन्च्युरी जंक्शन) ते हरी ओम जंक्शन, माहिम.
२.संपूर्ण केळूस्कर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर, शिवाजीपार्क, दादर.
३.संपूर्ण एम. बी. राऊत मार्ग, शिवाजीपार्क, दादर.
४.पांडुरंग नाईक मार्ग, (शिवाजीपार्क रोड नं.
५.शिवाजीपार्क, दादर.दादासाहेब रेगे मार्ग, शिवाजीपार्क, दादर.
६.दिलीप गुप्ते मार्ग:- शिवाजी पार्क गेट क्र. ४ ते शितलादेवी रोड, शिवाजीपार्क, दादर.
७.एल. जे. रोड : गडकरी जंक्शन, दादर ते शोभा हॉटेल, माहिम.
८.एन. सी. केळकर मार्ग हनुमान मंदिर सर्कल ते गडकरी जंक्शन, शिवाजीपार्क, दादर.
९.टी. एच. कटारीया मार्ग गंगाविहार जंक्शन ते आसावरी जंक्शन, माहिम.
१०.डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड महेश्वरी सर्कल ते कोहिनूर जंक्शन, दादर (पूर्व)
११.टिळक रोड:- कोतवाल गार्डन सर्कल, दादर (पश्चिम) ते आर. ए. किडवाई रोड, माटुंगा (पुर्व)
१२.खान अब्दुल गफारखान रोड :- सी लिंक गेट ते जे. के. कपुर चौक ते बिंदु माधव ठाकरे चौक.
१३.थडानी मार्ग:- पोददार हॉस्पीटल जंक्शन ते बिंदू माधव ठाकरे चौक,
१४.डॉ. ॲनी बेझंट रोड पोद्दार हॉस्पीटल जंक्शन ते डॉ. नारायण हर्डीकर जंक्शन.
जाहिर सभा दरम्यान वाहतुकीचे नियंत्रण आणि नियमन करण्यात येणारे मार्ग आणि आवश्यकता भासल्यास त्यांचे पर्यायी मार्ग खालील प्रमाणे
- स्वातंत्रवीर सावरकर मार्ग उत्तर वाहिनी: श्री. सिध्दिविनायक मंदिर जंक्शन ते यस बैंक जंक्शन.
पर्यायी मार्ग :- श्री. सिध्दिविनायक मंदिर जंक्शन उजवे वळण घेवून एस. के. बोले रोड, आगार बाझार, पोतुर्गीज चर्च, डावे वळण गोखले रोड किंवा एस. के. बोले मार्ग या रस्त्यांचा वापर करावा.
२.स्वातंत्रवीर सावरकर मार्ग दक्षिण वाहिनी येस बैंक जंक्शन ते श्री. सिध्दिविनायक मंदिर जंक्शन
पर्यायी मार्ग :- दांडेकर चौक येथे डावे वळण घेवून पांडूरंग नाईक मार्गे राजाबढे चौक येथे उजवे वळण घेवून एल. जे. रोड मार्गे गोखले रोड किंवा एन. सी. केळकर रोड या रस्त्यांचा वापर करावा. Mumbai 17 May Dadar Traffic Update
जाहिर सभेकरीता येणाऱ्यांस सुचना
जाहिर सभेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या वाहनांना निर्देशित केलेल्या ठिकाणापासून निश्चित केलेल्या वाहनतळ ठिकाणी पार्क करावीत.
१.पश्चिम आणि उत्तर उपनगरे पश्चिम आणि उत्तर उपनगरे येथून पश्चिम द्रुतगती मार्गाने येणारी वाहने सेनापती बापट मार्गाने माहिम रेल्वे स्थानक येथे आलेनंतर माहिम रेल्वे स्थानक ते रुपारेल कॉलेज यादरम्यान जाहिर सभेस येणाऱ्या नागरिकांना उतरुन वाहने रेती बंदर, माहिम, सेनापती बापट मार्गावर, कोहिनुर सार्वजनिक वाहनतळ, इंडिया बुल्स फायनान्स सेंटर सार्वजनिक वाहनतळ, कामगार मैदान, तसेच हलकी वाहने इंडिया बुल वन सेंटर सार्वजनिक वाहनतळामध्ये पार्क करु शकतात.
२.पुर्व उपनगरे : ठाणे, नवी मुंबई येथून पुर्व द्रुतगती मार्गाने येणारी वाहने दादर टी. टी. सर्कल येथे उतरुन वाहने पाव गार्डन-माटुंगा आणि आर. ए. के. ४ रस्ता येथे पार्क करावी.
३.शहरे व दक्षिण मुंबई: वीर सावरकर रोड मार्गे दक्षिण मुंबई कडून येणाऱ्या वाहनांना रविंद्रनाथ नाटय मंदिर येथे उतरून वाहने इंडिया बुल्स फायनान्स सार्वजनिक वाहनतळ, रहेजा सार्वजनिक वाहनतळ, सुदाम काळू अहिरे मार्ग, वरळी, पांडूरंग बुधकर मार्ग, ग्लास्को जंक्शन ते कुरणे चौक, सुदाम काळू अहिरे मार्ग, नारायण हर्डीक मार्ग ते सेक्रेट हार्ड हायुस्कूल ते जे. के. कपुर चौक पर्यंत तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड मार्गे येणाऱ्या वाहनांनी दादर टी. टी सर्कल येथे नागरिकांना सोडल्यावर पाच गार्डन माटुंगा किंवा आर. ए. के. ४ रोड या निर्देशित ठिकाणी पार्किंग करतील. Mumbai 17 May Dadar Traffic Update