क्राईम न्यूजमुंबई
Trending

Bhiwandi News : भिवंडीत भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षाची आणि भावाची निर्घृण हत्या

Bhiwandi Latest News : खर्डी येथील कार्यालयात धारदार शस्त्रांनी हल्ला; राजकीय वैमनस्यातून हत्या झाल्याची शक्यता

भिवंडी :- भिवंडीमध्ये सोमवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि त्यांचा भाऊ तेजस तांगडी यांची त्यांच्याच कार्यालयात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी सपासप वार केल्याने दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे भिवंडीत तणावाचे आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. Bhiwandi Latest Crime News

ही घटना भिवंडी तालुक्यातील खर्डी भागातील तांगडी यांच्या कंपनीच्या कार्यालयात घडली. सोमवारी रात्री प्रफुल्ल, तेजस आणि त्यांचे एक सहकारी कार्यालयात बसले होते. त्याच वेळी काही हल्लेखोर कार्यालयात घुसले आणि त्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात प्रफुल्ल आणि तेजस यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा सहकारीदेखील जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच भिवंडी तालुका पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाली आहे की, त्यामागे इतर काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. दोन्ही भावांच्या हत्येमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी लवकरच आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0