
Police recruitment Maharashtra : पालकमंत्रीपदावरून गोगावले नाराज? बैठकीला अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबई :- महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत (दि. 12 ऑगस्ट 2025) पोलीस दलात तब्बल 15 हजार पदांच्या भरतीला मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या भरतीची वाट पाहणाऱ्या तरुणांची प्रतीक्षा यामुळे अखेर संपली आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. Police recruitment Maharashtra
या बैठकीत पोलीस भरतीव्यतिरिक्त आणखी चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
अन्न व नागरी पुरवठा विभाग: रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
विमानचालन विभाग: सोलापूर-पुणे-मुंबई या हवाई प्रवासासाठी ‘Viability Gap Funding’ निधी देण्यास मंजुरी.
सामाजिक न्याय विभाग: विविध कर्ज योजनांसाठी असलेल्या जामीनदाराच्या अटी शिथिल करून शासन हमीस पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
गृह विभाग: 15,000 पोलीस भरतीला मंजुरी.
मंत्रिमंडळ बैठकीत ‘नाराजीनाट्य’
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरमधून ऑनलाइन उपस्थित राहिले. मात्र, शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले अनुपस्थित होते. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून त्यांची नाराजी असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाचा मान राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना मिळाल्यामुळे गोगावले नाराज असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्यांनी नाराजीचे वृत्त फेटाळून लावत दिल्लीत कामासाठी गेल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.


