•मिरारोड येथील तक्रारदाराची ‘वर्क फ्रॉम होम’ टास्कच्या नावाखाली झाली होती आर्थिक फसवणूक
मिरा-भाईंदर :- पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलीस ठाण्याने ‘टेलीग्राम टास्क फ्रॉड’मध्ये फसवणूक झालेल्या एका तक्रारदाराला त्याची संपूर्ण रक्कम परत मिळवून देण्यात मोठे यश संपादन केले आहे. सायबर पोलिसांनी 6 महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर 1 लाख 6 हजार 171 इतकी रक्कम तक्रारदाराच्या मूळ खात्यात परत केली आहे.
नेमका प्रकार काय घडला?
मिरारोड पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या रॉड्रिक्स हि महिला ‘वर्क फ्रॉम होम’साठी ऑनलाईन सर्च करत असताना, त्यांना टेलीग्रामवर ‘ऑनलाईन टास्क पूर्ण करून पैसे मिळवा’ अशा प्रकारची जाहिरात दिसली. सुरुवातीला काही छोटे टास्क पूर्ण केल्यावर त्यांना काही रक्कम मिळाली, ज्यामुळे त्यांचा विश्वास बसला.
अधिक कमवण्याच्या लालसेपोटी तक्रारदार यांनी मोठी रक्कम भरून अधिक टास्क विकत घेतले. मात्र, टास्क पूर्ण झाल्यानंतर त्यांना कोणतीही रक्कम मिळाली नाही आणि उलटपक्षी अधिक पैसे भरण्यास सांगण्यात आले. आपली आर्थिक फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीची NCCRP पोर्टलवर नोंद घेण्यात आली.
सायबर पोलिसांची तपास मोहीम
तक्रार दाखल होताच सायबर पोलिसांनी फसवणुकीची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये थांबवली.या व्यवहारांचा अधिक तपास करून फसवणुकीची रक्कम वर्ग झालेल्या संशयीत 10 बँक खात्यांची माहिती मिळवण्यात आली.यापैकी 7 बँक खात्यांना वारंवार पत्रव्यवहार करून रक्कम थांबविण्यात आली.
जप्त केलेली रक्कम परत मिळवण्यासाठी तक्रारदारांना न्यायालयात याचिका सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तक्रारदार यांनी याचिका सादर केल्यानंतर सायबर पोलीस ठाण्याने न्यायालयात सविस्तर अहवाल सादर केला आणि न्यायालयाचे आवश्यक आदेश प्राप्त केले.
अशा प्रकारे सायबर पोलीस ठाण्याने 7 बँकांसोबत सातत्याने सहा महिने पाठपुरावा करून तक्रारदार यांची फसवणूक झालेली संपूर्ण रक्कम 1 लाख 06 हजार 171 रुपये त्यांच्या मूळ बँक खात्यात परत मिळवली. तक्रारदार यांची रक्कम परत मिळाल्यानंतर त्यांना प्रतिकात्मक चेक देऊन माहिती देण्यात आली.
पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर आणि त्यांच्या टीमने ही यशस्वी कामगिरी पार पाडली.
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…