
Mumbai Latest Tadipar News : मुंबई पोलिसांच्या परिमंडळ-7 हद्दीत दहशत पसरविणे, लूटमार करणे, खुनाचा प्रयत्न करणे, मारामारी, तोडफोड करणे, अपहरण, अपहार, यांसारख्या गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत आरोपींना तडीपार
मुंबई :- विविध गुन्हे दाखल असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि नवी मुंबई जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. Mumbai Tadipar News होळी रंगपंचमी आणि रमजान यांसारख्या सणामुळे शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून दक्षता म्हणून या दोन सराईत आरोपींना परिमंडळ-7 पोलिसांनी Mumbai Police Unit 7 कारवाई करत हद्दपार केले आहे. अमर लालचंद लगाडे (30 वय) आणि कादर बरिश खान/पठाण (40 वय) असे तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.
लगाडे आणि खान/पठाण या दोघांविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगारांचे गुन्हे गंभीर असून, लोकांमध्ये त्यांची दहशत निर्माण होऊ लागल्याने तसेच सध्या होळी, रंगपंचमी आणि रमजान या सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून तडीपारीची कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र पोलिस कायद्याप्रमाणे तडीपारीची प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे. असे आदेश विजयकांत सागर पोलीस उप आयुक्त परिमंडळ-7 यांनी दिले आहे.

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई देवेन भारती, पोलीस मह आयुक्त, कायदा व सुव्यवस्था, सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, डॉ. महेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-7, मुंबई विजयकांत सागर यांनी केली.