Mumbai Tadipar News : मुंबई शहरातील चार गुंड तडीपार, पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांचे आदेश

Mumbai Tadipar Latest News : मुंबई पोलिसांच्या परिमंडळ-7 मधील पंतनगर, कांजुरमार्ग, मुलूंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईतांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई :- मुंबई पोलिसांच्या परिमंडळ सातमधील चार गुंडांना शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यचे Mumbai Tadipar Criminal आदेश परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी दिले. गेल्या दोन महिन्यात या भागातील अनेक आरोपींना तडीपार करण्यात आले आहे.

साहिल नसीर शेख (वय 19),राहुल दौलत बत्रा (वय 29),सिद्धेश शंकर चाळके (वय 22),नवनीत उर्फ जीवा राजेश पांडे, (वय 22) अशी तडीपार करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत. शहरातील गु्ंडांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
मुंबई पोलिसांच्या परिमंडळ सातमधील पंतनगर, कांजुरमार्ग,मुलूंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईतांविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांच्याकडे पाठविण्यात आला होता.एकाचवेळी चार आरोपींना तडीपार केले. चारही आरोपी सराईत असून त्यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.