मुंबई

Mumbai Tadipar News : एकाच वेळी शहरातील पाच गुंड तडीपार, पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांचे आदेश

•मुंबई पोलिसांच्या परिमंडळ सातमधील घाटकोपर, कांजूरमार्ग,भांडुप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईतांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई :- पोलिसांच्या परिमंडळ‌ सातमधील पाच गुंडांना शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यचे आदेश परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी दिले. पाच तडीपार आरोपींमध्ये दोन महिला आरोपींचाही यामध्ये समावेश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

घाटकोपर पोलीस ठाणे हद्‌दीतील किरण सुधाकर तोंडसे (वय 31),कांजुरमार्ग पोलीस ठाणे हद्‌दीतील जिजाबाई अशोक जाधव, (वय 60) , आशा काशीनाथ माने उर्फ आशा सुरेश गोस्वामी, (वय 60) वर्ष व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 अन्यये सक्रिय असलेले भांडुप पोलीस ठाणे हद्‌दीतील जियाऊद्द्दिन मुनिर अन्सारी उर्फ लालु, (वय 26) , फिरोज मुनिर अन्सारी उर्फ इद्दू (वय 21) वर्ष अशी तडीपार करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत. शहरातील गु्ंडांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. एकुण 05 सराईत आरोपींना ठाणे ,नवी मुंबई, मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे.

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई देवेन भारती, पोलीस सह आयुक्त, कायदा व सुव्यवस्था, सत्यनारायण चौधरी,अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, डॉ. महेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-7 मुंबई विजयकांत सागर यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0