क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mumbai Tadipar Criminal News : मुंबई : परिमंडळ 6 अंतर्गत तब्बल 56 गुन्हेगार तडीपार

Mumbai Tadipar Criminal List : विधानसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

मुंबई :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील परिमंडळ (6) कार्यक्षेत्रातील 53 गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.शहरातील परिमंडळ (6) कार्यक्षेत्रात चेंबूर, गोवंडी, नेहरूनगर, चुनाभट्टी, ट्रॉम्बे, मानखुर्द,आरसीएफ, देवनार, शिवाजीनगर, टिळकनगर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

तडीपार करण्यात आलेल्या आरोपीचे नाव

विधानसभा निवडणुक शांततामय व सुरक्षित वातावरणात पार पाडण्याकरीता परिमंडळ 6 अंतर्गत येणा-या पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी त्यांचे पोलीस ठाणे अभिलेखावरीत आरोपीतांचा हद्दपारीचा प्रस्ताव परिमंडळ 6 कार्यालयास सादर केला असता, पोलीस उप आयुक्त, परिमंडल 6, मुंबई यांनी सुनावणीअंती महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 अन्वये चेंबूर पोलीस ठाणेमधील रितेश प्रभाकर भारसाखळे उर्फ रित्या, मोहम्मद फरीद आलीम शेख, मानखुर्द पोलीस ठाणेमधील मोहम्मद दाजीम मलावर शेख, साबीअली इसरार अहमद शेख, आरसीएफ पोलीस ठाणेमधील मुक्तार अब्दुल रशिद शेख, शफिक उर्फ अंजी मोहम्मद अली शेख, मनिष उर्फ मन्या शंकर चौधरी, तौफिक मो. अली शेख, विशाल सत्यजित रहिये, सलमान मोहदिया खान, रफिक मोहम्मद अली शेख, शुभम जॉन नाडर, सनी बुध्दी परिहार, टिळकनगर पोलीस ठाणेचे शफिक अहमद अब्दुल अजिम मन्सुरी, आसिफ अब्दुल शेख, मोहम्मद उमर सयदअली खान, अतिकुर रहमान इरफान चौधरी या टोळी प्रमुख व टोळी सदस्य अशा 17 आरोपींना हद्दपार केले.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56 अन्वये चेंबूर पोलीस ठाणे हद्दीतील साहिल सुनिल निकम, शंकर यशवंत वैदघाटे, गोवंडी पोलीस ठाणे ह‌द्दीतील योगेश सुर्यकांत कदम, हितेश अमर अजई, अमोल रमेश हातपले, नेहरूनगर पोलीस ठाणे ह‌द्दीतील मनिवेल उर्फ मनी राजु हरिजन, चुनाभटटी पोलीस ठाणे हद्दीतील सिध्देश विजय गव्हाळे, सागर मधुकर मोरे, शुभम बालु शेलार, ट्रॉम्बे पोलीस ठाणे हद्दीतील फारूख शेदुल उर्फ मन्नान शेख, आनंद वसंत कांबळे, मानखुर्द पोलीस ठाणे ह‌द्दीतील विजय बाला देवेदर उर्फ कोडर, दशरथ प्रकाश धुनगव, रमजान मोहम्मद इसराकअली चोधरी, उजेफा उर्फ बादशाह मोहम्मद सरस्वर शेख, मैन्नुददीन मुनीर अहमद खान, आरसीएफ पोलीस ठाणे हद्दीतील जाफर जमिल अहमद खान उर्फ आण्णा, साहिल शाहीद खान, देवनार पोलीस ठाणे ह‌द्दीतील संतोष संजय अहिरे, जावेद इक्बाल हुसेन सव्यद उर्फ सोनू, शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्‌दीतील मोहम्मद आजाद उर्फ अज्जू नासीर रेहमत शेख, शहानवाज मो. शफी मोमीन उर्फ साबू, मो. गुलाम वारीस साहिद खान उर्फ गुंडा, रियाजउवदीन नवाबउद्द्दिन शेख उर्फ काजू, मो जुबेर मो झहीर शेख उर्फ जिब्बो, अब्दुल राशिद अब्दुल रशीद शेख, अब्दुल झहीर अब्दुल हकिम चौधरी/खान उर्फ गुड्‌डु, आसिफ हानिफ अन्सारी उर्फ पाया, अहमदअली अजगर अली शेख, टिळकनगर पोलीस ठाणे हद्दीतील मणीकंदन हनुमंत आवळे, खंडु नवनित कांबळे, अजय विजय मेहता, परवेझ अब्दुल समद शेख असे 30 सराईत गुन्हेगार हद्दपार केले आहेत.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 57 अन्वये शिक्षा भोगून आलेल्या सेदुपती शक्तीकुमार, मो. राशिद उर्फ सलमान उर्फ छोटु शकील अहमद, अरूण रमेश राउत अशा 03 सराईत गुन्हेगार हद्दपार केले आहेत.

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई देवेन भारती, पोलीस सह आयुक्त, कायदा व सुव्यवस्था, सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, डॉ.महेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 6 मुंबई नवनाथ ढवळे यांनी शहरातील तब्बल 53 गुन्हेगारांवर तडीपार केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0