मुंबई | वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीत एका अपंग महिलेने १६व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी दुपारी घडली. मृत महिलेचे नाव शीतल पवार (वय 40) असे असून, त्या त्यांच्या पतीसोबत त्या सदनिकेत राहत होत्या.काल (16 जुलै) दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास शीतल यांनी इमारतीच्या वरच्या मजल्यावरून खाली उडी घेतली. घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, त्या शारीरिकदृष्ट्या अक्षम (अपंग) असल्याने त्यांनी आत्महत्या कशी केली, याच्या विविध शक्यतांचा खेरवाडी पोलीस तपास करत आहेत.
मृत शीतल पवार या चालू शकत नव्हत्या, त्यामुळे ही आत्महत्या नेमकी कोणत्या मानसिक किंवा कौटुंबिक कारणामुळे घडली, याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही. यावेळी त्यांचे पती सतीश पवार (वय 45) हे घरीच होते. मात्र कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणी खेरवाडी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
मुंबईतील उंच इमारतींवरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. मागील तीन महिन्यांत ही अशा प्रकारची आठवी घटना असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शहरातील उंच इमारतींमध्ये सुरक्षाव्यवस्था व मानसिक आरोग्य जनजागृतीची गरज अधिक अधोरेखित होत आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…