Mumbai Suicide Case : आईने अभ्यासात लक्ष घालण्यास सांगितल्याने मुलाने संतापून गळफास लावून आत्महत्या!
Mumbai Suicide Case : नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला त्याच्या आईने वारंवार अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले, त्यामुळे तो इतका संतापला की त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले.
मुंबई :- एका 14 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. Mumbai Suicide Case भांडुप परिसरात ही घटना घडली. विद्यार्थ्याच्या आत्महत्येमागील धक्कादायक कारण समोर आले आहे. त्याच्या आईने त्याला अभ्यास करण्यास सांगितले होते, त्यामुळे रागाच्या भरात त्याने गळफास लावून घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.प्राथमिक माहितीनुसार विद्यार्थ्याने घरातील बेडरूममध्ये गळफास लावून घेतला. भांडुपची ही हायफाय सोसायटीची घटना आहे. मुलाला जवळच्या रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. भांडुप पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भांडुपच्या रुणवाल ग्रीन्स सोसायटीत ही घटना घडली. हा विद्यार्थी नववीत शिकत होता. ही घटना रात्री दरम्यान घडली. त्याने छताच्या पंख्याला नायलॉनची दोरी बांधून आत्महत्या केली.आईने खोलीचा दरवाजा उघडला असता घटनेची माहिती समोर आली. मुलाला तातडीने फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.त्याच्या आईने वारंवार अभ्यासात लक्ष देण्यास सांगितल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. विद्यार्थ्याचे वडील व्यापारी तर आई गृहिणी आहे.