Mumbai Spa Racket : खार-बांद्रा-जुहूतील ‘स्पा’ केंद्रांवर सेक्स रॅकेटचा संशय: ‘फुल सर्व्हिस’चा नवा ट्रेंड?
मुंबईत वाढती ‘स्पा’ केंद्रांमधील अनैतिक धंद्यांची चर्चा
महाराष्ट्र मिरर:मुंबई- सौभाग्या शर्मा:
Mumbai Spa Racket : खार, बांद्रा, जुहू भागातील काही ‘स्पा’ केंद्रांमध्ये आरामदायी सेवेच्या आड “फुल सर्व्हिस” या नावाखाली हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती मिळत आहे. Mumbai Spa Sex Racket या स्पा केंद्रांमध्ये थाई आणि परदेशी महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक शौकीन या ठिकाणी आकर्षित होत आहेत. तक्रारी असूनही पोलिसांची Mumbai Police कारवाई केवळ दिखाऊ असल्याची नागरिकांमधून चर्चा आहे.
पोलिसांची कारवाई अपुरी?
गेल्या काही महिन्यांत, मुंबई पोलिसांच्या अनैतिक व्यापार प्रतिबंधक पथकाने काही स्पा केंद्रांवर छापे टाकले. खार येथील ‘मिझमार थाई स्पा’वर केलेल्या कारवाईत सेक्स रॅकेट उघडकीस आले असून, चौघांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, असे प्रकार वारंवार उघड होत असूनही पुन्हा पुन्हा हे व्यवसाय जोरात सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. निवडणुका जवळ येत असल्याने पोलिसांची कारवाई वाढली आहे, तरी या “स्पा” केंद्रांकडे दुर्लक्ष का होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय आणि तरुणींवर अन्याय
या व्यवसायात तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला जातो, आणि त्यांना अनैतिक धंद्यांमध्ये ढकलले जाते. याविरुद्ध ठोस पावले उचलली जात नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांमध्ये नाराजी असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंधित व्यक्तींच्या संगनमतामुळेच हे व्यवसाय चालत असल्याचा आरोप आहे.
मुंबई पोलिसांचा निष्काळजीपणा?
मुंबई पोलिस Mumbai Police जगातील आदरणीय पोलिस दलांमध्ये गणले जातात, मात्र ‘स्पा’ व्यवसायांवर अंकुश ठेवण्यात त्यांना अपयश येत आहे. अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याचे पालन का होत नाही, हे प्रश्न विचारात घेण्याची वेळ आली आहे.