मुंबई, दि. २६ ऑगस्ट, महाराष्ट्र मिरर (प्रतिनिधी) Mumbai Spa Sex Racket
मुंबईतील उच्चभ्रू ठिकाणी ‘स्पा’ च्या पडद्याआड महिला मुलींना वेश्या व्यवसायात ओढणारी ‘सिमरन’ मुंबईत अनेक ठिकाणी आपले काळे उद्योग राजरोसपणे करत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. राज्यात महिलांवर वाढत्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी राज्य शासन कसोशीने प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र राजधानीचे शहर असणाऱ्या मुंबईतच ‘सिमरन’ स्पाच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवीत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात येत आहे. जानेवारी महिन्यात ‘सिमरन’ विरुद्ध ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाण्यात स्त्री व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियमाखाली गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात अद्याप ‘सिमरन’ कोण याचा उलगडा पोलीस करू शकले नाहीत. स्पा च्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणारी मास्टर माईंड ‘सिमरन’ मुंबई पोलिसांसमोर आव्हान ठरत आहे.
रघुवंशी मिल कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या ‘मुद्राम स्पा अँड सलून’ येथे मुंबई पोलिसांनी कारवाई करत ९ मुलींची सुटका केली होती. याबाबत ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाणे येथे गुरन. ८२/२०२४ भादंवि ३७० (३), ३७० (१), ३४, २९४, ११४, स्त्री व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम ५, ४, ३(१) अन्वये संशयित आरोपी आशितोष राजू कावडे व सिमरन यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्ह्यातील ‘सिमरन’ कोण या विषयी माहिती पुढे येऊ शकली नाही. ‘सिमरन’चा शोध घेण्यात ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाणे हतबल ठरल्याचे तपासातून दिसून येत आहे.
बलात्काराच्या गुन्ह्यातील अर्जुन गगनसिंग बिस्त आणि ‘स्पा’ माफिया ‘सिमरन’ कनेक्शन तपासणे मुंबई पोलिसांसमोर आव्हान ठरत आहे.
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…