Mumbai Police Latest Crime News : बोरिवलीतील एकाच इमारतीतील संतापजनक घटना; सीसीटीव्हीत अत्याचाराची कृती कैद; आरोपीला पोलीस कोठडी
मुंबई :- मुंबईतील बोरिवली Mumbai Borivali पूर्व परिसरातून एका इमारतीमध्ये घडलेली अत्यंत संतापजनक आणि निंदनीय घटना समोर आली आहे. एकाच इमारतीत राहणाऱ्या 65 वर्षीय निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने Mumbai Police Officer लिफ्टमध्ये एका 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. Mumbai Latest Crime News
संध्याकाळी सातच्या सुमारास मुलगी लिफ्टमधून घरी जात असताना, या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने क्रूरतेने तिला लिफ्टमध्ये ओढले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अत्याचाराची ही संपूर्ण लाजिरवाणी कृती लिफ्टमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
या घटनेनंतर पीडित मुलीने घरी जाऊन आपल्या आईला त्वरित माहिती दिली. मुलीच्या आईने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत आरोपी निवृत्त पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक केली. अटक केल्यानंतर आरोपीला बोरिवली कोर्टात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला 12 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कस्तुरबा मार्ग पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…