Mumbai Share Market Fraud : शेअर बाजारात नफ्याचं आमिष ; महिलेची तब्बल ‘इतक्या’ कोटींचा गंडा
Mumbai Police Arrested Cyber Criminal : मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाचे उत्तम कामगिरी ; फसवणुकीतील 1.22 कोटी रुपये वाचवण्यात यश
मुंबई :- शेअर बाजारात गुंतवणूक Share Market Investment केली तर अधिकचा नफा मिळेल, असं आमिष दाखवून भामट्यांनी ऑनलाईन माध्यमातून मुंबईच्या चेंबूर Mumbai Chembur Fraud परिसरात राहणाऱ्या महिलेची एकूण 1 कोटी 22 लाख रुपयांची फसवणूक केली. Mumbai Cyber Crime Department मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाच्या 1930 हेल्पलाइन पथकाने महिलेचे पैसे वाचवण्यास मदत केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या चेंबूर येथील परिसरात राहणाऱ्या एका महिलेला शेअर मार्केटच्या नावाखाली तब्बल एक कोटी 22 लाख 2 हजार 671 रुपयांची फसवणूक केली होती. महिलेने वेगवेगळ्या बँकेच्या खात्यावर सायबर भुरट्यांकडे पाठवलेले पैसे मुंबई पोलिसाच्या सायबर विभागाने गोठविण्यात यश आले आहे. सायबर हेल्पलाईन 1930 कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोर, पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती बावस्कर, महिला पोलीस शिपाई वालावलकर, पोलीस शिपाई पाटील यांनी एवढी रक्कम परत मिळवून दिलं आहे.
पोलीस पथक
विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, देवेन भारती, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त, गुन्हे, शशीकुमार मिना, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, दत्ता नलावडे, पोलीस उप आयुक्त, सायबर गुन्हे, राजेंद्र शिरतोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, सायबर गुन्हे विभाग यांचे मार्गदर्शनाखाली दत्ताराम चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पश्चिम प्रा. सायबर पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोर, पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती बावस्कर 1930 सायबर हेल्पलाईन, गुन्हे शाखा, मुंबई यांच्या पथकाने पार पाडली आहे.