क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mumbai Share Market Fraud : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस फायदा होईल, वर्षाला 84% अधिक परतावा,400 ते 500 लोकांची फसवणूक केल्याची शक्यता

Mumbai Share Market Fraud News: समरयश ट्रेडिंग कंपनी सेबी रजिस्टर असल्याचे सांगून अनेक गुंतवणूकदारांची कोटावधीची फसवणूक, 400 ते 500 लोकांची आर्थिक पसरवणूक झाल्याची शक्यता, आरोपीला मध्यप्रदेश मधून अटक

मुंबई :- आशिष दिनेश कुमार शहा (44 वर्ष), यांची स्वतःची समरयश ट्रेडिंग नावाची शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग (samraysha Treading Company) करणारी कंपनी होती. आशिष शहा हा मुंबईच्या वर्सोवा परिसरात राहणार होता. त्याने आपल्या परिचयाच्या लोकांना त्याच्या कंपनीमध्ये आर्थिक गुंतवणूक केल्यास जवळपास 84 टक्के परतावा मिळेल असे आमिष दाखविले होते. समरयश ट्रेडिंग कंपनी ही सेबी रजिस्टर असून त्यातून मिळणाऱ्या पैशातून ऑफिस घर वाहने सोने असे कमावल्याचे त्यांनी चित्र दाखविले होते. शहा यांनी तुम्ही माझ्याकडे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Share Market Treading) केल्यास तुम्हालाही अशाच प्रकारे फायदा मिळेल असे लोकांना आमिष दाखविले होते. लोकांचा विश्वास संपादन करून लोकांचे पैसे घेऊन गुंतवणूक करण्याच्या नावाने लोकांचे विश्वासघात केले होते. Mumbai Latest Share Market Fraud News

400 ते 500 लोकांची करोडोची फसवणूक

शहा यांच्याकडे गुंतवणूकदार यांनी शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देतो असे आश्वासन दिल्याने त्या रकमेतून कोणत्याही प्रकारचे गुंतवणूक न करता स्वतःच्या फायद्यासाठी ते पैसे वापरण्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. अटक आरोपींकडून जवळपास 1900 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम पंचवीस लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहे. मुंबईसह मीरा-भाईंदर तामिळनाडू येथील लोकांनीही त्यामध्ये गुंतवणूक केली असून सर्वसाधारणपणे 400 ते 500 लोकांची फसवणूक करून आरोपींनी काही करोडापेक्षा जास्त रक्कम फसवल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. Mumbai Latest Share Market Fraud News

पोलिसांकडून आरोपीला मध्य प्रदेश मधून अटक

आरोपी हा गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देऊन वेगवेगळ्या राज्यात शहरात सातत्याने आपल्या ठाव ठिकाण बदलत होता. पोलिसांनी तांत्रिक मदतीने आरोपी हा मध्य प्रदेश मध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दोन महिन्यापासून पोलिसांनी शोध घेऊन पोलिसांनी आरोपीला मध्य प्रदेश मधून अटक केली आहे. आरोपींनी सखोल तपास करून तसेच तांत्रिक तपास स्थानिक पोलिसांच्या मदतीने आणि गोपनीय मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीला अटक केली आहे. आरोपीच्या विरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात कलम 406,409,420,506 (2), भादंविसह कलम 3,4 महाराष्ट्र ठेवीदाराच्या अधिनियमाप्रमाणे 1999 गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. Mumbai Latest Share Market Fraud News

पोलीस पथक

पोलीस आयुक्त विवेक फणसळकर(Mumbai CP Vivek Phansalkar) ,विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशि कुमार मीना, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) दत्ता नलावडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आययुत (डी विशेष) दत्तात्रय नाळे यांच्या देखरेखीखाली मालमत्ता कक्ष, गु.प्र.शा., मुंबई या कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक मंगेश देसाई, पोलीस निरीक्षक प्रविण मोहिते, अरुण थोरात (खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा), पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवळी (एस.आय.टी., गुन्हे शाखा), पोलीस हवालदार अरुण सावंत, चिंतामण इस्नक, तुषार सावंत (मालमत्ता कक्ष, गुन्हे शाखा), अशोक शिंदे, सचिन ननावरे, पोलीस शिपाई मयुर थोरात (एस.आय.टी., गुन्हे शाखा) यांनी बजावलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0