Mumbai Latest Share Market Fraud Latest News : दोन अज्ञात व्यक्तींकडून फसवणूक; व्हॉट्सॲप ग्रुपवरील मेसेजमुळे उघडकीस
मुंबई :- शेअर बाजारामध्ये Share Market Fraud मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून विक्रोळीतील एका 21 वर्षीय अभियंत्याची पावणेचार लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणाने पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. Mumbai Latest Crime News
सफिन कुरेशी नावाच्या 21 वर्षीय अभियंत्याला काही दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीचा मेसेज आला. या व्यक्तीने आपण शेअर बाजारामध्ये काम करत असून, त्याच्याकडील ॲपमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या सफिनने त्यावर विश्वास ठेवला आणि त्याला तात्काळ होकार दिला. त्यानंतर एका महिलेने त्याला फोन करून गुंतवणुकीविषयी सविस्तर माहिती दिली.
या महिलेच्या सांगण्यावरून सफिनने वेगवेगळ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी एकूण 3.75 लाख रुपये भरले. मात्र, काही दिवसांनंतर एका व्हॉट्सॲप ग्रुपवर हे ॲप फसवणूक करत असल्याचा मेसेज त्याला मिळाला. यामुळे सफिनला संशय आला आणि त्याने तात्काळ पैसे काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला पैसे काढता आले नाहीत. त्याने संबंधित महिलेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तिचा फोन बंद होता.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…