क्राईम न्यूज

Mumbai Share Market Fraud : ‘कमी गुंतवणुकीत दुप्पट नफा’ ठरला मोठा तोटा; शेअर बाजाराच्या जाहिरातीला भुललेल्या बँक कर्मचाऱ्याला 23 लाखांचा गंडा”

Mumbai Share Market Latest Fraud News : माटुंग्यातील निवृत्त कर्मचाऱ्याची फसवणूक; सोशल मीडियावर संपर्क साधून दोन ॲपमध्ये एकूण 23 लाख 18 हजार रुपयांची गुंतवणूक.

मुंबई :- शेअर बाजारामध्ये Share Market Fraud कमी गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याच्या आमिषाला भुलून माटुंगा येथील एका खासगी बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्याला सायबर भामट्यांनी तब्बल 23 लाख 18 हजार रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. Mumbai Latest Share Market Fraud News

या प्रकरणातील 50 वर्षीय तक्रारदार शेअर बाजारात गुंतवणूक करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांना समाजमाध्यमांवर शेअर बाजाराशी संबंधित एक आकर्षक जाहिरात दिसली. त्यावर दिलेल्या मोबाइल क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला.

ॲपवर रक्कम दुप्पट, पण…

संपर्क साधलेल्या व्यक्तीने तक्रारदारांना शेअर बाजारविषयक माहिती देऊन काही वॉट्सॲप ग्रुप्समध्ये समाविष्ट केले. अधिक गुंतवणूक करण्याची इच्छा असल्याने तक्रारदारांनी होकार दिला. त्यानुसार, संबंधित व्यक्तीने त्यांना त्यांच्या मोबाइलमध्ये एक ॲप घेण्यास सांगितले आणि याच ॲपद्वारे गुंतवणूक करण्याची सूचना केली.

तक्रारदारांनी सुरुवातीला दहा हजार रुपये जमा केले. विशेष म्हणजे, दुसऱ्याच दिवशी ॲपवर ही रक्कम दुप्पट झाल्याचे दिसले. यामुळे तक्रारदारांचा विश्वास वाढला. त्यांनी अशाच प्रकारे दुसऱ्या एका जाहिरातीवरून अन्य एका ॲपमध्ये गुंतवणूक केली.

गुंतवले 23 लाख, पण पैसे काढणे अशक्य

दोन्ही ॲप्समध्ये तक्रारदारांनी एकूण 23 लाख 18 हजार रुपये गुंतवले होते. काही दिवसांनी त्यांना पैशांची गरज असल्याने त्यांनी ॲपमधून रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही ॲप्समधून त्यांना पैसे काढता आले नाहीत. त्यांनी तातडीने संबंधित मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता, त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेऊन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून, या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

52 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago