Mumbai Sex Racket : व्हाट्सअपच्या माध्यमातून चालू होता वेश्याव्यवसाय ; अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाची कारवाई, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
Nalasopara Police Busted Sex Racket : पोलिसांकडून वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या दलाल महिलेला अटक, वेश्याव्यवसायाच्या दलदलीतून एका पीडित महिलेची सुटका
नालासोपारा :- आधुनिक तंत्राचा वापर करून सायबर गुन्हेगारी Cyber Crime नंतर आता वेश्या व्यवसायासाठी ही व्हाट्सअप महत्त्वाचे साधन मानले जाते. वसईमध्ये राहणाऱ्या एका महिलेकडून व्हाट्सअप द्वारे छुप्या पद्धतीने वेश्याव्यवसाय चालू होता. Nalasopara Police पोलिसांनी वेश्याव्यवसाय करणाऱ्या दलाल महिलेला अटक केली असून वेश्याव्यवसायातील दलदलीतून एका पीडित महिलेची सुटका केली आहे. Nalasopara Latest Crime News
एक महिला वेश्यादलालाकडून पाच हजारांच्या बदल्यामध्ये मुली पुरविल्या जात असल्याची माहिती अनैतिक मानवी प्रतिबंध शाखेचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांना मिळाली होती. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे बोगस गिऱ्हाईक आणि दोन पंचांच्या समक्ष कारवाई करत वेश्यादलाल नुरजहॉ युनुस शेख, (35 वय रा. वसई) हिला अटक केली आहे. एका पिडीत महिलेची सुटका करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षास यश आलेले आहे. Nalasopara Latest Crime News
या दरम्यान, एका बनावट ग्राहकाच्या माध्यमातून या माहितीची खातरजमा करण्यात आली. या प्रकाराची माहिती या गिऱ्हाईकाने या पथकाला मोबाईलवर मिस कॉलद्वारे दिली. त्यानंतर हे धाडसत्र राबविण्यात आले. या धाडसत्रात पोलिसांनी वेश्यादलाल हिला अटक केली असून पीडित महिलेची सुटका केली आहे.तसेच नुरजहॉ युनुस शेख, (वय 35 रा.वसई) ही महिलांना पैशाचे आमिष दाखवून पीडित महिलांना वेश्या व्यवसायाचे काम करून घेत असेल आणि त्या मोबदल्यात काही रक्कम त्यांना दिली जात असत याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेच्या विरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम 143(2) सह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 4,5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Nalasopara Latest Crime News
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा), यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार, सहाय्यक फौजदार गवई, पोलीस हवालदार किणी, महिला पोलीस हवालदार डोईफोडे, पोलीस हवालदार शेटये, महिला पोलीस हवालदार तिवले, पोलीस हवालदार शिंदे, महिला पोलीस हवालदार पाटील सर्व नेम.अनै.मा.वा. प्र.कक्ष नालासोपारा यांनी पार पाडली आहे.