Mumbai Latest Sex Racket Busted News : साईधाम मंदिराजवळील ग्रांट रोड परिसरात लपवलेल्या वेश्यालयावर पोलिसांची कारवाई
मुंबई | मुंबई पोलिसांनी Mumbai Police शहरात चालणाऱ्या देहव्यापाराच्या साखळीवर जोरदार कारवाई केली आहे. Mumbai Sex Racket मलबार हिल पोलिसांनी मंगळवारी ग्रांट रोड (पूर्व) येथील साईधाम मंदिरापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर सुरू असलेल्या एका वेश्यालयावर छापा टाकत आठ जणांना अटक केली. या कारवाईत 10 पीडित महिलांची सुटका करण्यात आली.
पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये सोनी गणेश शर्मा, रिंजी निमा शेरपा, कृष्णा बिलट भुइयां, विक्रम रजनी भुइयां, अरुण दामोदर यादव, महेशा एच. शिवन्ना, पप्पू कुमार सरजु यादव आणि अमित कुमार कन्हैया यादव यांचा समावेश आहे. हे सर्वजण संगनमताने वेश्यालय चालवत होते आणि महिलांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलत होते, असे तपासात स्पष्ट झाले आहे.
तपासादरम्यान हेही उघड झाले की 14 ग्राहक हे महिलांना जबरदस्तीने वेश्यावृत्तीकडे प्रवृत्त करत होते. पोलिसांनी या ठिकाणाहून सुमारे 82 हजार 300 रुपये रोख रक्कम तसेच 2.04 ग्रॅम अमली पदार्थ जप्त केला असून, त्याची बाजार किंमत अंदाजे 10 हजार रुपये आहे. हा नशा विक्रीसाठी बाळगण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायदा, एनडीपीएस कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरु आहे. पोलिस आता या रॅकेटमधील इतर गुन्हेगारांवर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी नुकतेच जाहीर केले की गेल्या दोन वर्षांत अशा 35 बांग्लादेशी महिलांना अटक करण्यात आली आहे, ज्या अवैध मार्गाने भारतात आल्या आणि मुंबईत वेश्याव्यवसायात सहभागी झाल्या. भारतात प्रवेशासाठी त्यांनी एजंटमार्फत 15 ते 20 हजार रुपये दिल्याचे उघड झाले आहे. एजंट त्यांना सीमापार नेण्याची आणि वेश्यालयांमध्ये पोहोचवण्याची व्यवस्था करत होते
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…