Mumbai Sex Racket Busted : हॉटेलमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
Mumbai Mira Bhayandar Police Busted Sex Racket : भाईंदर पोलिसांची कारवाई ; आश्रय लॉजिंग अँड बोर्डिंगवर छापा, पीडित तरुणीची सुटका
भाईंदर :- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, भाईंदर यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे नगर फाटक रोड गोडदेव नाक्याजवळ भाईंदर पूर्व येथे असलेल्या शितल स्मृती इमारतीमधील आश्रय लॉजिंग अँड बोर्डिंगवर पोलिसांनी छापा टाकून (Police Raid ) अवैधरित्या चालू असलेल्या सेक्स रॅकेटचा (Sex Racket Busted) पर्दाफाश केला आहे. या छाप्यामध्ये पोलिसांनी पीडित तरुणीची सुटका केली आहे. Mumbai Sex Racket Busted News
भाईंदर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार लॉजचे मालक, मॅनेजर, वेटर हॉटेलमध्ये राहण्याकरिता येणाऱ्या गिऱ्हाईकांना तीन हजार रुपयात राहण्यासाठी रूम भाड्याने देत होते. मुली पूर्वत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती. Mumbai Sex Racket Busted News
पोलीसांची कारवाई
भाईंदर पोलिसांनी (Mira Bhayandar Police News) बोगस गिऱ्हाईक आणि दोन पंचांच्या साक्षीने आश्रय लॉजिंग अँड बोर्डिंगवर छापा टाकून लॉजिंग चा आरोपी मालक आणि चालक यांना अटक केले आहे. या छापे मारीत पोलिसांनी मॅनेजर महेश यादव (56 वर्ष), वेटर राजेश रोहन प्रसाद (33 वर्ष), वेटर जानाई नजेमुद्दीन मलिक (49 वर्ष), दीपक कुमार यादव (28 वर्षे) यांनी पीडित तरुणीला सोबत घेऊन सेक्स रॅकेट चालवत होते. पोलिसांनी रंगेहाथ हॉटेलच्या मॅनेजर महेश यादव यांना पैसे स्वीकारताना अटक केले आणि पीडित महिलेची सुटका केले या घटनेवेळी सहाय्यक फौजदार उमेश हरी पाटील यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आश्रय लॉजिंग अँड बोर्डिंगचे आरोपी मालक व चालक यांना ताब्यातील मॅनेजर आणि वेटर यांच्याविरुद्ध नवघर पोलीस ठाण्यात भादवि कलम 370,34 सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 चे कलम 3,4,5,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Mumbai Sex Racket Busted News