क्राईम न्यूजमुंबई

Mumbai Robbery News : ज्येष्ठ महिलेच्या हातातील पर्स चोरी करणाऱ्या चोरट्याला 5 तासात अटक

Mumbai Dr. Dadasaheb Bhadkamkar Police Arrested Robbers within 5 hours : डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिसांची कारवाई

मुंबई :- भुलेश्वर भागात राहणाऱ्या पुरबी वैद्य (वय 61) हया मामा परमानंद मार्ग, चर्नी रोड येथून पायी चालत असताना 20 ते 25 वयोगटातील तरुणाने त्यांच्या हातातील पर्स चोरल्याचे घटना समोर आली आहे.Mumbai Robbery News डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिसांची Dr Dadasaheb Bhadkamkar Police Station कारवाई करत अवघ्या पाच तासात आरोपीला शोधून काढले आहे. तसेच, चोरलेल्या पर्समधील मुद्देमालासह ती पर्स ज्येष्ठ महिलेला परत देण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांनी दिलेला माहितीनुसार, घटना घडल्यानंतर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-2, मुंबई डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी डॉ. दा. भ. मार्ग पोलीस ठाणे. एल. टी. मार्ग पोलीस ठाणे, मलबारहील पोलीस ठाणे, पायधुनी पोलीस ठाणे, व्ही. पी रोड पोलीस ठाणे आणि गावदेवी पोलीस ठाणे अशा सहा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी आणि पथक यांच्या सहा टीम तयार केल्या.

डॉ.दा. भ. मार्ग पोलीस ठाण्याचे गुन्हेप्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास तुपे, पोलीस उपनिरीक्षक गौरव तंवर व पथक यांनी केलेल्या तंत्रिक तपासाच्या अनुषगाने लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे, मुंबई गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कांबळे, पोलीस हवालदार समीर परुळेकर, योगेश राऊत, पोलीस शिपाई दत्तात्रय सातपुते,अनिल साळुंके यांनी गोपनीय बातमीदारमार्फत पाहिजे आरोपीचा शोध घेऊन पाहिजे आरोपी आरिफ झाकीर शेख,( वय 20) , यखला दाना बंदर डोंगरी येथुन ताब्यात घेऊन डॉ.दा. भ. पोलीस ठाणेच्या ताब्यात दिले.

डॉ.दा. भ. मार्ग पोलीस ठाण्यास सदर आरोपीकडे सखोल तपास केला असता त्याचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास अटक करून जबरी चोरी केलेली रक्कम 15 हजार रूपये हस्तगत करण्यात आली आहे.

अटक आरोपीकडे अधिक तपास केला असता सदर आरोपीने मरीन लाईन पोलीस ठाणे Marine Line Police Station हद्दीत देखील अशाच प्रकारची जबरी चोरी केल्याचे सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0