क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mumbai Robbery News : मुंबई हादरली – ४ कोटींचा सोन्याचा खजिना लंपास!

Mumbai Bhoiwada Police Latest News : भोईवाडा पोलिसांची थरारक कारवाई – राजस्थानपर्यंत पोलिसांचा पाळत ठेऊन चोरट्यांना सापळ्यात पकडले

Mumbai : मुंबईच्या मध्यवर्ती परेल परिसरातील ए-जलिचंद ज्वेलर्स या नामांकित सोन्याच्या दुकानातून तब्बल ४ कोटी ७ लाख ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम एका विश्वासू कामगारानेच लांबवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या चोरीने ज्वेलर्स जगतात खळबळ उडाली आहे. Mumbai Police Latest Crime News

८ सप्टेंबरच्या दुपारपासून ९ सप्टेंबरच्या सकाळपर्यंतच्या दरम्यान, कामगार जितु नवाराम चौधरी (वय २३) हा दुकानातील सोन्याचे दागिने आणि रोकड लबाडीच्या इराद्याने चोरून फरार झाला. ४ कोटींच्या या सोन्याच्या खजिन्याने पोलिसांच्या तपासाला अक्षरशः आंतरराज्यीय वळण मिळाले.

✦ राजस्थानपर्यंत पोलिसांचा पाळत

भोईवाडा पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा मागोवा घेत राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील सादडा गावात सापळा रचला. मुंबईहून धाव घेतलेल्या पथकाने पाहिजे आरोपी जितु चौधरीसह त्याचे दोन साथीदार – कमलेश वाघाराम चौधरी (२६) आणि भरतकुमार ओटाराम चौधरी (३८) – यांना जेरबंद केले.

✦ लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

आरोपींकडून आतापर्यंत ७० टक्के चोरीचा माल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून उर्वरित सोन्याचा मागोवा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांचा अंदाज आहे की उर्वरित माल लपविण्यासाठी आरोपींनी अत्यंत कौशल्यपूर्ण डाव खेळला आहे.

✦ पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

Indian Police Service (IPS) officer Deven Bharti is appointed as the new commissioner of Mumbai police

मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहआयुक्त सत्यनारायण चौधरी, गुन्हे शाखेचे लखमी गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली भोईवाडा पोलीस ठाणे व गुन्हे शाखा कक्ष-४ यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई पार पाडली. सापळा, तांत्रिक तपास आणि सततचा पाळत यामुळेच ही कोटींची चोरी अवघ्या काही दिवसांत उकलण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0