Mumbai Bunty Bubali Robbers Arrested : घरफोड्या करणारी बंटी बबली जोडी मुंबई पोलिसांनी जेरबंद केलीय. घर फोडी करण्याची विशेष म्हणजे दिवसाढवळ्या ही जोडी घरफोड्या करायची. बंटी आणि बबलीचा हा कारनामा…
मुंबई :- घरफोड्या करणारी बंटी बबली च्या जोडी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-8 जेरबंद केलीय. विशेष म्हणजे दिवसाढवळ्या ही जोडी घरफोड्या करणारी आहे. Mumbai Bunty Bubali Robbers Arrested 5 जानेवारी दुपारी विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फिर्यादी यांच्या घरी आई आणि दिव्यांग घर कामगार महिला यांना दोघांनी चाकूचा भाग दाखव धाक दाखवून हात-पाय-तोंड चिकटपट्टीने बांधून घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण सात लाख 85 हजारांची चोरी झाल्याची तक्रार विलेपार्ले पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या संदर्भात पोलिसांनी आरोपींच्या विरोधात कलम 304(4),126(2),3(5) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गुन्हा हा दिवसा निवासी परिसरात तसेच ज्येष्ठ महिला व दिव्यांग महिलेच्या बाबतीत घडल्याने त्याची गंभीर दखल घेवून गुन्हे शाखेने गुन्हयाचा तपास चालू केला होता. गुन्हयाच्या समांतर तपास गुन्हे शाखेच्या कक्ष-8 कडून करण्यात येत होता. गुन्हयातील पाहिजे आरोपी अतिशय चलाखीने गुन्हा घडल्यापासून मुंबईतून निघून गेला होता. गुन्हयातील पाहिजे आरोपींचा ठावठिकाणा तांत्रिकरीत्या व मानवी कौशल्याने शोधण्यात आला आहे.तपासा दरम्यान गुन्हयात एक महिला आरोपीचा सहभाग असल्याचे निष्पण्ण झाले. महिलेकडे चौकशी करून ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेकडे परागंदा झालेल्या आरोपीची कसून चौकशी करण्यात आली. पाहिजे आरोपीचा शोध घेतला असता तो ठाणे परिसरात असल्याचे तांत्रिकरित्या स्पष्ट झाले. प्राप्त माहितीच्या आधारे कक्ष-8 चे पोलीस पथक यांनी पाहिजे आरोपीस परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले.बाबु आनंद सिंदल, (वय 27) आणि श्वेता जयेश लडगे, (वय 35 रा.वर्सोवा, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. तसेच आरोपी बाबुल सिंदल त्याच्या विरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हाही दाखल आहे.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त (बृहन्मुंबई) विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त (बृहन्मुंबई) देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशि कुमार मीना, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-1) विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-पश्चिम) प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष-8 चे प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार प्रजापती, सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर धुतराज, सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्कर्ष वझे कक्ष-9, सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल प्रभु, पोलीस उपनिरीक्षक विकास मोरे, पोलीस उपनिरीक्षक जयेंद्र कानडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिरसाट, बनसोडे, पोलीस हवालदार यादव, किणी,काकडे, कुरकूटे,सावंत,कांबळे, सकट, पोलीस शिपाई रहेरे, पोलीस शिपाई सटाले, महिला पोलीस शिपाई गायकवाड, महिला पोलीस शिपाई भिताडे, पोलीस शिपाई बिडवे, साळवे, होळंबे, भूमकर कक्ष-9 पोलीस हवालदार कामत,डवंग यांनी पार पाडली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…