Mumbai Ghatkopar Latest Robbery News : कुलूप तोडून सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास, पोलिसांनी 1.60 लाखांचा मुद्देमाल केला जप्त
मुंबई :- रात्रीच्या वेळी बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा घाटकोपर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने रिक्षाचा माग काढत या टोळीतील तिघा आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून 1 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Mumbai Latest Crime News
काय आहे प्रकरण?
18 सप्टेंबर रोजी घाटकोपरमधील नारायण नगर परिसरात राहणारे मुशीर शेख यांच्या घरात चोरी झाली होती. शेख कुटुंब बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, घड्याळ आणि इतर मौल्यवान वस्तू असा एकूण सव्वादोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. दुसऱ्या दिवशी कुटुंब परतल्यावर त्यांना ही घटना लक्षात आली आणि त्यांनी तात्काळ घाटकोपर पोलीस ठाण्यात Ghatkopar Polive Station तक्रार दाखल केली.
पोलिसांनी कसा केला तपास?
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता, एका कॅमेऱ्यात आरोपींनी गुन्ह्यासाठी वापरलेली रिक्षा दिसून आली. त्या रिक्षाच्या नंबरवरून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला.
तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी अब्दुल अन्सारी (21 वय), स्टेर्लिन कौडर (28 वय), आणि मुस्ताक शेख (33 वय) या तीन आरोपींना गोरेगाव परिसरातून ताब्यात घेतले. हे तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे.पोलिसांनी या आरोपींकडून चोरी केलेला 1 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, त्यांच्याकडून इतर गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…