मुंबई

Mumbai Rain Update : पावसाचा मुंबईत कहर! अंधेरी सबवे पाण्याखाली, वाहतूक ठप्प

Mumbai Latest Rain News : निचल्या भागांत पाणी साचले; विमानसेवा, वाहतूक व्यवस्था कोलमडली

मुंबई | राजधानी मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, पश्चिम उपनगरातील अनेक भागांमध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषतः अंधेरी परिसरातील सबवेमध्ये सुमारे 4 ते 5 फूट पाणी साचल्याने ते पूर्णतः वाहतुकीसाठी बंद करण्यात आलं आहे. परिणामी, वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत असून, वाहतूक पोलिसांनी कंबर कसून व्यवस्था सांभाळण्यास सुरुवात केली आहे. Mumbai Latest Rain Update

पावसामुळे मुंबईतील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. लोकांना कार्यालय, शाळा, दवाखाने गाठण्यात अडथळे येत आहेत. अंधेरीसारख्या निचल्या भागात पाणी साचून परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. प्रशासनाकडून या भागांत पंपद्वारे पाणी काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

दरम्यान, मुसळधार पावसाचा फटका हवाई सेवांनाही बसला असून, इंडिगो एअरलाइन्सने प्रवाशांसाठी ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. कंपनीने फ्लाइटमध्ये होणाऱ्या विलंबाबाबत प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करत, प्रवासापूर्वी फ्लाइट अपडेट्स तपासण्याचा सल्ला दिला आहे.

पोलिसांचा इशारा — समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहा, आपत्कालीन सेवांसोबत संपर्क ठेवा

मुंबई पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, समुद्रकिनारे आणि जलभरलेल्या भागांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी 100, 112 किंवा 103 या क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा, असं आवाहन पोलिस दलाकडून करण्यात आलं आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

19 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

19 hours ago