क्राईम न्यूज

Mumbai Rain Update : कुर्ल्यातील नेहरू नगर पोलीस ठाणे जलमय; पोलिसांना पाण्यात उभं राहून काम करण्याची वेळ

Mumbai Rain Latest News : चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, घाटकोपरमध्येही पूरसदृश स्थिती; जनजीवन विस्कळीत

मुंबई :- गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरांत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अनेक भागांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका आता पोलिसांनाही बसला असून, कुर्ल्यातील नेहरू नगर पोलीस ठाणे पूर्णपणे जलमय झाले आहे. येथे पोलीस कर्मचाऱ्यांवर गुडघाभर पाण्यात उभे राहून काम करण्याची वेळ आली आहे.

पोलीस ठाण्यात दोन फूट पाणी

सोमवारी रात्री पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाल्याने नेहरू नगर पोलीस ठाण्याच्या आवारात दोन फुटांपर्यंत पाणी साचले होते. पोलीस ठाण्याच्या आवारात पाणी साचल्याने अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांना धोका निर्माण झाला आहे. पाणी थेट पोलीस अधिकाऱ्यांच्या दालनांपर्यंत पोहोचले, ज्यामुळे कामात मोठा व्यत्यय आला.

पूर्व उपनगरांतील परिस्थिती

नेहरू नगर पोलीस ठाण्याप्रमाणेच पूर्व उपनगरातील अनेक भागात अशीच परिस्थिती आहे. चुनाभट्टी येथील स्वदेशी मिल परिसर आणि रेल्वे स्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तसेच चेंबूरमधील टेभी पूल, शेल कॉलनी, टिळक नगर, कुर्ल्यातील रेल्वे कॉलनी, कल्पना सिनेमा परिसर, बैल बाजार, मानखुर्द, गोवंडी, घाटकोपर आणि विक्रोळी परिसरातही पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. वाहतूक मंदावली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago