मुंबई

Mumbai Rain : पावसाने हाहाकार माजवला! शाळा बंद, अनेक धरणांमधून पाणी सोडले, प्रशासन सतर्क

Mumbai Rain Update राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगडसह अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबई :- राज्याततील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला असून, त्यामुळे अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले असून, नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी (22 जुलै) मुसळधार पावसाची शक्यता असल्याने काही जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगड, चंद्रपूर, भंडारा, नागपूर आणि गडचिरोली येथील शाळा बंद राहतील. याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातही शाळा न सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. Mumbai Rain

चंद्रपूर शहराजवळील इराई धरणाचे सर्व 7 दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले असून, त्यामुळे 462 क्युसेक पाणी इराई नदीत सोडण्यात येत आहे. सध्या वर्धा नदीची पाणीपातळी कमी असल्याने इराई नदीतील पाणी झपाट्याने वाढत आहे. मात्र, गोसीखुर्द धरणातून पाणी सोडल्यास वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढून वर्धा आणि नंतर इराई नदीवर परिणाम होऊ शकतो. Mumbai Rain

गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही संततधार पाऊस सुरू आहे. धापेवाडा बॅरेजचे 21 दरवाजे चार मीटरपर्यंत उघडून गोसीखुर्द धरणात 2,85,768 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, त्यामुळे गोसीखुर्द धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. Mumbai Rain

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0