मुंबई

Mumbai Rain Powai Lake: पावसाच्या आगमनाने पवई तलाव दुथडी भरून वाहू लागला; मुंबईच्या जलसाठ्यात दिलासादायक वाढ

Mumbai Rain Powai Lake overflow: मुंबईच्या सातही जलसाठ्यांमध्ये वाढ; 10 टक्क्यांवर पोहोचला पाणीसाठा, पालिकेला व नागरिकांना दिलासा

मुंबई | मुंबईत दमदार सुरुवात केलेल्या मान्सूनमुळे पावसाने आता दमदार अस्तित्व दाखवले असून, Mumbai Rain Powai Lake शहरातील प्रसिद्ध पवई तलाव बुधवारी पहाटे 6 वाजता पूर्ण क्षमतेने भरून दुथडी वाहू लागला आहे. गेल्या दोन दिवसांतील संततधार पावसामुळे पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तलाव भरत गेला आणि अखेर त्याचे पाणी मिठी नदीमध्ये वाहू लागले. Mumbai Rain Powai Lake overflow

महापालिकेच्या जल अभियंता विभागानुसार, सद्यस्थितीत तलावाची पाणी पातळी 195.90 फूटांवर पोहोचली आहे, तर तलावाची एकूण जलधारण क्षमता 545 कोटी लीटर इतकी आहे. हा कृतिम तलाव 1890 मध्ये बांधण्यात आला असून याचा वापर मुख्यतः औद्योगिक कारणांसाठी केला जातो. पवई तलाव पर्यटनासाठीही प्रसिद्ध असून सध्या तलावाकाठी गर्दी उसळल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. Mumbai weather updates

दरम्यान, या पावसाचा सकारात्मक परिणाम आता मुंबईच्या मुख्य जलसाठ्यावरही दिसू लागला आहे. उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, भातसा, मध्य वैतरणा, विहार आणि तुळशी या सातही जलसाठ्यांमध्ये मिळून सध्या 10.19 टक्के पाणी शिल्लक आहे. सोमवारी केवळ 8.60 टक्के पाणीसाठा असताना, मंगळवारी तो 9.78 टक्क्यांवर, तर बुधवारी सकाळपर्यंत तो 10 टक्क्यांवर पोहोचला.

मुंबईसारख्या महाकाय शहरासाठी उन्हाळ्यानंतरचा हा पावसाचा शिडकावा आणि त्यातून निर्माण झालेली जलसाठ्यांची भर काहीशी दिलासादायक मानली जात आहे. पुढील काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहिल्यास, शहराच्या पाणीपुरवठ्यात स्थिरता येण्याची शक्यता असल्याचे महापालिकेचे सूत्र सांगतात

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

7 hours ago