Mumbai Rain Latest News : मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या लोकल उशिराने; प्रवाशांची मोठी गैरसोय
मुंबई :- राज्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून, मुंबईसह उपनगरांत रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील दोन ते तीन तास अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईत सकाळपासूनच सर्वत्र काळोख पसरला असून, यामुळे लोकल सेवांवर मोठा परिणाम झाला आहे.
लोकल सेवा विस्कळीत
मध्य रेल्वे: कल्याण ते सीएसएमटी मार्गावर लोकल 8 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहेत. दादर रेल्वे स्थानक परिसरात ट्रॅकवर पाणी साचायला सुरुवात झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली आहे.
पश्चिम रेल्वे: विरार ते चर्चगेट लोकल 5 ते 7 मिनिटे उशिराने धावत आहेत.
हार्बर लाईन: नेरूळ ते सीएसएमटी लोकल 6 ते 7 मिनिटे उशिराने धावत आहेत.
मोनोरेलही बंद
मुसळधार पावसामुळे लोकल सेवेवर परिणाम झालेला असतानाच, तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेल सेवाही ठप्प झाली आहे. ही मोनोरेल बंद पडली तेव्हा त्यात 17 प्रवासी होते, ज्यांना दुसऱ्या मोनोमध्ये सुरक्षितपणे हलवण्यात आले. सध्या एकाच ट्रॅकवर दोन मोनोरेल असल्यामुळे सेवा सुरळीत नाही.
दादरमध्ये रस्त्यांवर पाणीच पाणी
दादर पूर्व रेल्वे स्टेशन परिसरात गुडघाभर पाणी साचले आहे. स्वामीनारायण मंदिराकडून राजगृह दिशेने जाणारा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. यामुळे वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. प्रवाशांना पाण्यातून चालत स्टेशन गाठावे लागत आहे, ज्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…