क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mumbai Police News: मुंबई पोलिसांची तक्रार निवारण दिन मोहीम ; नागरिकांचे मोठ्या प्रमाणात उपस्थिती

Mumbai Police Unit 7 Takrar divas: मुंबई पोलिसांची तक्रार निवारण दिन मोहीम दिनानिमित्त परिमंडळ-7 कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यात 212 तक्रारीचे निवारण

मुंबई :- मुंबई पोलिसांकडून मुंबईतील सर्व पोलिस ठाण्यात दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी तक्रार निवारण दिन आयाेजित करण्यात येणार आहे. दुसऱ्या शनिवारी निमित्त मुंबई पोलिसाच्या परिमंडळ-7 Mumbai Police Unit 7 अंतर्गत येणाऱ्या आठ पोलीस ठाण्यात 212 नागरिकांनी सहभाग नाेंदवला आहे.100 महिला, 81 पुरुष तर 31 ज्येष्ठ नागरिकांचा समावेश हाेता. Mumbai Police Latest News

या वेळी महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांसंबंधी तक्रारींना प्राधान्य देत विविध पोलिस ठाण्यांतील वरिष्ठ निरीक्षक व इतर अधिकाऱ्यांनी त्यांच्या तक्रारींचे निरसन केले. पोलिस ठाण्यातील दखलपात्र व अदखलपात्र गुन्ह्यांतील फिर्यादी तसेच अर्जदार पोलिस ठाण्यात हजर होते.

राज्य सरकारच्या शंभर दिवसाच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत मुंबई पोलिस आयुक्तालय अंतर्गत सर्व पोलिस ठाण्यांत दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येते. या मोहिमेत सर्व विभागांतील विभागीय सहायक पोलिस आयुक्त हजर होते. तसेच, प्रादेशिक विभागांचे अपर पोलिस आयुक्त व परिमंडळीय पोलिस उपआयुक्त यांनी भेटी घेऊन मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0